Morcha on NMC : नाशिकमधील सिडको परिसरात स्थानिकांचा हंडामोर्चा

पाण्याच्या मागणीसाठी नाशिक महापालिकवर हंडामोर्चा; आंदोलक आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
cidco, nashik
पाण्याच्या मागणीसाठी नाशिक महापालिकवर नागरिकांनी हंडामोर्चा काढला.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक :  सिडको नवीन नाशिक, खुटवडनगर आदी परिसरातील गेल्या काही महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.14) माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हंडे आपटत पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. मनपा आयुक्तांनी आंदोलकांची प्रवेशद्वारावर येऊन भेट न घेतल्यास महापालिकेत शिरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि अनियमित पाणी पुरवठा, विजसमस्या आदी विषय चर्चेत येऊ लागले आहेत. माेर्चाप्रसंगी माजी नगरसेविका सुुवर्णा मटाले यांच्याकडून पाणी पुरवठा विस्कळीत होण्यामागे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे. सर्व राजकीय पक्ष, विद्यमान आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन, आंदोलने करूनही अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. महिला वर्गातील असंतोष या आंदोलनातून प्रगट होत आहे.

शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेविका सुुवर्णा मटाले, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, युवा सेना जिल्हाध्यक्ष दीपक दातीर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.14) सकाळी 11 वाजता सिडको, खुटवडनगर भागातील महिला महापालिका प्रवेशद्वारावर धडकल्या. सुरक्षारक्षकांना दमदाटी करीत मोर्चा थेट प्रवेशद्वारावर आला. अचानक घडलेल्या या घटनाने मनपाच्या सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली.

ऐन पावसाळ्यात सद्धा पाणी समस्या जैसे थे

प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर महिलांनी हंडे आदळून पाणी पुरवठा विभागाचा निषेध नोंदवला. तर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी धारणकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. संतप्त महिलांनी ठिय्या देत मनपा आयुक्तांच्या प्रवेशद्वारावर न्याय देण्याची मागणी केली. ऐन पावसाळ्यात सुद्धा अंबड औद्योगिक वसाहतीलगतचा एक्सो पॉइंट ते खुटवडनगरपर्यंतच्या भागात पाणी पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात धरणात पाणी नसतांना पाणीकपात ही बाब नागरिकांनी गृहीत धरली. मात्र पावसाळ्यानंतर धरणे तुडुंब असतानाही शहरात जाणिवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला. पाण्याअभावी घरातील दैनंदिन कामे करणे अशक्य झाले आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दैनंदिन गरजही भागत नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news