

Nursing College Incident Student Molestation, Principal FIR
नाशिक : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील ४ विद्यार्थिनींने विनयभंगाचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण रमेश घोलप या संशयित प्राचार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिकमध्ये द्वारका सर्कल येथील एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यातील एक विद्यार्थिनी ही ५ ऑगस्ट २०२४ पासून २९ मे २०२५ पर्यंत कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या काळात प्राचार्य प्रवीण घोलप यांनी वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्यही केले. इतकंच नव्हे तर एकदा महाविद्यालयाच्या आवारातच प्राचार्याने साडी खेचण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.