Nashik Road ISP Mock Drill | नाशिकरोड 'आयएसपी'मध्ये गोळीबार अन् बॉम्बस्फोटाचे आवाज; 4 दहशतवाद्यांचा खात्मा करत सुरक्षेची रंगीत तालीम

Nashik Road ISP Mock Drill | आयएसपीमध्ये दहशतवादी हल्ल्याचे मॉकड्रिल, सुरक्षा यंत्रणांनी चार अतिरेक्यांचा खात्मा
Nashik Road ISP Mock Drill
Nashik Road ISP Mock Drill
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
अचानक झालेला गोळीबार आणि बॉम्बस्फोटाच्या आवाजाने बुधवारी सायं. इंडिया सिक्युरिटी प्रेसचा (आयएसपी) परिसर हादरून गेला. चार सशस्त्र दहशतवाद्यांनी प्रेसची सुरक्षा भेदून हल्ला केल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. काही वेळात परिसरात चकमकीचे वातावरण निर्माण झाले.

Nashik Road ISP Mock Drill
NDCC Bank | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकांची पुन्हा फेरचौकशी; सहकार विभागाचे मोठे आदेश

मात्र, हा सर्व प्रकार संभाव्य दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्याची रंगीत तालीम (मॉकड्रिल) असल्याचे स्पष्ट होताच कामगार आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पुढाकाराने बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ च्या सुमारास आयएसपी प्रेसमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले.

संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या वेळी प्रेसची सुरक्षाव्यवस्था किती सक्षम आहे, विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय किती प्रभावी आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्याची क्षमता किती आहे, याची चाचणी या माध्यमातून घेण्यात आली. मॉकड्रिलमध्ये चार सशस्त्र दहशतवाद्यांनी प्रेस परिसरात घुसखोरी केल्याची माहिती मिळताच सीआयएसएफ, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), शहर पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ मोर्चाबांधणी केली.

कारवाईदरम्यान चारही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारूगोळा, बॉम्ब आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. सरावात सीआयएसएफचे ८३ जवान, जलद प्रतिसाद पथकाचे १७ जवान, स्थानिक पोलिसांचे १५ कर्मचारी, बॉम्ब शोध व निकामी पथकाचे सहा अधिकारी-कर्मचारी आणि श्वानपथक सहभागी झाले.

तसेच गुप्तचर यंत्रणा आणि प्रेसच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. मॉकड्रिलदरम्यान आपत्कालीन प्रतिसाद, त्वरित निर्णयक्षमता, दळणवळण व्यवस्था, विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय आणि हल्ल्याच्या वेळी सुरक्षा दलांची तत्परता यांचे परीक्षण करण्यात आले.

Nashik Road ISP Mock Drill
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत स्थायी समितीचा मोठा उद्रेक; 650 कोटींची वाढीव कामे कागदावरच!

सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट चंचलकुमार, मनो कुमार भारती, विजय सोनवणे, निरीक्षक कीर्तीकुमार, दुर्गा प्रसाद यादव, ए. दुर्गा प्रसाद, निर्मित कंबोज यांच्यासह विविध सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी या सरावात सहभागी झाले.

यंत्रणांची प्रतिहल्ल्याची क्षमता तपासली

आयएसपी प्रेसची मालमत्ता, अधिकारी-कर्मचारी आणि कामगारांची सुरक्षितता अबाधित ठेवत संभाव्य दहशतवादी हल्ला परतवून लावण्याची क्षमता तपासणे हा मॉकड्रिलचा मुख्य उद्देश होता. यापूर्वी गेल्या आठवड्यात करन्सी नोट प्रेसमध्येही अशाच प्रकारची दहशतवादी हल्ला परतवून लावण्याची रंगीत तालीम घेण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news