Nashik Road Central Jail | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोबाईलवर बोलताना कैद्याचा व्हिडिओ व्हायरल; सुरक्षेचा बोजवारा!

Nashik Road Central Jail | मोबाईलवर बोलतानाचा कैद्याचा कथित व्हिडिओ व्हायरल
Nashik Central Jail
Nashik Central Jail Pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारागृहातील कैद्याचा मोबाईलवर बोलतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने 'भिंतीआड बंदोबस्त कडक की, मोबाईलला मोकळा रस्ता?' असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

Nashik Central Jail
Nashik Market Committee | नाशिक बाजार समितीवर 37 वर्षांनंतर अशासकीय प्रशासक मंडळ; अध्यक्षपदी गणेश गिते यांची निवड!

प्रतिबंधित मोबाईल कारागृहाच्या आत पोहोचला कसा, तो कैद्याच्या हातात कोणी दिला आणि प्रवेशद्वारावरील तपासणी यंत्रणा नेमकी काय करत होती, याची मुळापर्यंत चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कारागृहमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असतानाही त्याचा कथित वापर ही अत्यंत गंभीर बाब आहे. मोबाईल बाहेरून फेकण्यात आला, भेटीसाठी आलेल्या व्यक्तीमार्फत आत पोहोचला की, अन्य कोणत्या मार्गाने कैद्यापर्यंत गेला, याचा तपास होणे गरजेचे आहे. संबंधित कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश नोंदी, भेटीसाठी आलेल्या व्यक्तींची तपासणी आणि ड्युटीवरील अधिकारी - कर्मचाऱ्यांची माहिती तपासण्याची गरज आहे.

दुसरीकडे, काही कैद्यांची सुटका झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने समर्थक, नातेवाईक आणि वाहने कारागृहाच्या मुख्य गेटबाहेर जमा होत असल्याच्या तक्रारी आहेत. 'भाई इज कमिंग' म्हणत घोषणाबाजी, फोटोशूट, व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. अशा गर्दीत परस्परांना खुन्नस देणे, बाचाबाची होणे किंवा हाणामारीचा प्रसँग उद्भवल्यास त्याचा थेट परिणाम कायदा - सुव्यवस्थेवर आणि वाहतुकीवर होऊ शकतो.
विशेष म्हणजे, सुटका होणाऱ्या कैद्यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यास कारागृह गेट परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Nashik Central Jail
Nashik Pune Semi High Speed Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेरात जागरण गोंधळ; काकोडकर समितीची मुदत संपली

गर्दीत एखाद्या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सुटकेच्या वेळी प्रवेशद्वाराबाहेर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि वाहनांच्या हालचालींचे नियोजन करणे आवश्यक आहे.
आत मोबाईल आणि बाहेर शक्तिप्रदर्शनाची गर्दी या दोन्ही गंभीर बाबींकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास उद्या मोठा अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
कारागृह प्रशासनाने सुटका होणाऱ्या कैद्यांच्या स्वागतासाठी होणाऱ्या गर्दीवरही प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news