Citylink Bus Advertisement Scam | सिटीलिंकमध्ये हजारो कोटींच्या जाहिरात घोटाळ्याचा आरोप

Citylink Bus Advertisement Scam | जाहिरात कराची रक्कम वसूल करा : मयूरी पवार
Citylink Bus Advertisement Scam
Citylink Bus Advertisement Scamfile
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिटीलिक बससेवेमध्ये कोट्यवधींचा जाहिरात कर मागील सात वर्षांपासून वसूल न झाल्याचा गंभीर आरोप मनसे नगरसेविका मयूरी पवार यांनी केला. हा कोट्यवधींचा घोटाळा असून, जाहिरात कराची रक्कम वसूल करून सामान्य नागरिकांच्या करामध्ये सूट द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Citylink Bus Advertisement Scam
अभोण्यात अग्नितांडव : पत्र्याच्या 6 गाळ्यांना भीषण आग, लाखोंचे नुकसान

नाशिक महापालिकेच्या वतीने सिटीलिंकच्या माध्यमातून बससेवा पुरविली जाते. यासाठी मेसर्स ट्रॅव्हल्स टाइम्स प्रा. लि. व मेसर्स सिटी लाइफलाइन कार रेंटल प्रा. लि. ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत.

या ठेकेदारांनी सात वर्षांपासून बसेसवर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातींवर कोणताही कर भरलेला नाही. तसेच सिटीलिंक अधिकाऱ्यांनी व कर खात्यानेदेखील तो वसूल केलेला नाही. ही बाब नगरसेविका मयूरी पवार यांनी उघड केली असून, या माध्यमातून महापालिकेला मिळणारे कोट्यवधींचे उत्पन्न जवळपास बुडाले आहे.

Citylink Bus Advertisement Scam
Nashik Politics | नाशिकचे तीन मंत्री एकापाठोपाठ निशाण्यावर...

सिटीलिकमार्फत २०२४ मध्ये करवसुलीसाठी ठेकेदारांना मागणी पत्र दिलेले होते, परंतु तरीही अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या हितसंबंधामुळे ही रक्कम वसूल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा कोट्यवधींचा जाहिरात घोटाळा असून, यास जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणीही मयूरी पवार यांनी केली. सिटीलिंकमध्ये हजारो कोटींचे घोटाळे असून, वेळोवेळी हे सर्व सभागृहात मांडणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठेकेदाराच्या हितासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. नियमानुसार जाहिरात कर गोळा करण्यात यावा व त्या माध्यमातून सामान्य नागरिकांना करामध्ये सूट द्यावी. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व कामचुकारपणा सहन केला जाणार नाही.

- मयूरी पवार, नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news