Found Year Baby | ...अखेर 'ती' बेपत्ता चिमुकली सापडली

Found Year Baby | येवला व नांदगाव पोलिसांच्या तत्परतेमुळे चिमुकली पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परतली
Baby Found in Bag Lakhni
Baby Found in Bag LakhniPudhari
Published on
Updated on

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी (बामूळवाडी) परिसरातून आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली अवघी आठ महिन्यांची बालिका मध्यरात्री अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. तनू मच्छिंद्र मोरे असे या चिमुकलीचे नाव असून, रविवारी (दि. २०) सकाळी येवला तालुक्यातील वाईबोथी येथे एका शेताच्या कडेला ती बेवारस अवस्थेत शेतमजुरांना आढळली.

Baby Found in Bag Lakhni
Nashik Nandgaon Kidnapping Case: नांदगाव हादरले! मन्याड चौकीतील ८ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण

येवला व नांदगाव पोलिसांच्या तत्परतेमुळे चिमुकली पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबरच्या रात्री मोरे कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास बालिकेची आई जागी झाली असता शेजारी झोपलेली आठ महिन्यांची तनू दिसून आली नाही.

बालिका अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र, बराच शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर नांदगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील वाड्या-वस्त्या, नातेवाईक तसेच संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवली. बालिकेचा शोध घेण्यासाठी श्वानपथक तसेच तज्ज्ञांचीही मदत घेतली.

Baby Found in Bag Lakhni
Nashik Rabi season | खरीप निभावला, जिल्ह्यात रब्बी हंगाम संकटात, नांदगाव - मालेगावसह काही मंडळांमध्ये परिस्थिती बिकट

दरम्यान, रविवारी सकाळी येवला तालुक्यातील वाईबोथी येथे एका शेताच्या कडेला शेतमजुरांना बालिका आढळली. बालिका दिसताच त्यांनी तत्काळ येवला पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच येवला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालिकेला ताब्यात घेतले. यानंतर बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासणीनंतर बालिका सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येवला व नांदगाव पोलिसांनी चिमुकलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. मात्र बालिकेचे अपहरण कसे झाले आणि येवला तालुक्यातील वाईबोथी येथे कशी पोहोचली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news