आषाढी एकादशी : मंत्री छगन भुजबळांनी घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. अशी केली प्रार्थना
Minister Chhagan Bhujabal took darshan of Vitthal Rukmini
मंत्री छगन भूजबळांनी घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन Pudhari Photo
Published on
Updated on

नगरसुल : पुढारी वृत्तसेवा

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.

Minister Chhagan Bhujabal took darshan of Vitthal Rukmini
Maharashtra MLC Election : क्रॉस व्होटिंग करणा-या काँग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाईचा बडगा?

आषाढी एकादशीच्या निमित्ताने येवला कोटमगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत मनोभावे दर्शन घेतले. तसेच चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. यावेळी उपस्थित भाविकांना मंत्री छगन भुजबळ यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Minister Chhagan Bhujabal took darshan of Vitthal Rukmini
Ashadhi Wari 2024 | नर्सी नामदेवमध्ये अवतरले प्रति-पंढरपूर

यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, सरपंच राजेंद्र काकळीज, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, विशाल परदेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news