Mateen Patel Bail Nashik Court | एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला नाशिक सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर!

Mateen Patel Bail Nashik Court | न्यायालयाच्या सुनावणींना नियमित हजर न राहणे मतीन पटेल यास चांगलेच महागडले होते.
Court
प्रतीकात्मक छायाचित्र.file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसेच लैंगिक अत्याचारप्रकरणी निदा खानला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला जामीन मिळाला आहे. न्यायालयाच्या सुनावणींना नियमित हजर न राहणे मतीन पटेल यास चांगलेच महागडले होते.

Court
Nashik SIR | नाशिक जिल्ह्यात 'एसआयआर' प्रक्रिया 100 टक्क्यांच्या नजीक; मुदतीच्या अंतिम दिवशी प्रशासनाची धावपळ

सोमवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात मतीन पटेलला हजर करण्यात आले. निदा खान हिला आश्रय दिल्याचा कारणावरून मतीन पटेलची विशेष पथकाने सहा वेळा नाशिकमध्ये चौकशी केली होती, परंतु त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नियमित सुनावणी न्यायालयामध्ये सुरू झाली.

या सुनावणीच्या वेळेस मतीन पटेल हा न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट बजावले होते. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती. त्याला काही अटी व शर्तींच्या आधारे व ७५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. पटेल याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Court
Pune Nashik Highway Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर दोन तासांची कोंडी; २५ वर्षे घोषणाच, चाकणकरांचा संताप

सोमवारच्या सुनावणीत सरकारी पक्ष आणि मूळ तक्रारदाराने जामिनाला विरोध केला. मात्र, न्यायालयाने तपासाच्या काळात आरोपीला अटकच करण्यात आली नव्हती आणि केवळ न्यायालयीन आदेशानंतर तो कारागृहात गेल्याची बाब महत्त्वाची मानली.

दानिशच्या जामीन अर्जावर २७ ला सुनावणी

कंपनीतील पीडित युवतीवर अत्याचार तसेच तिचे धर्मांतर केल्याप्रकरणी दानिश शेख हा मुख्य संशयित आरोपी आहे. या प्रकरणातील इतर नऊ संशयित आरोपींना जामीन मिळाला असला तरी दानिश याला मात्र यापूर्वीच न्यायालयाने देवळाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन नामंजूर केला आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी दानिशने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी (दि. १७) सुनावणी होणार होती, परंतु फिर्यादी महिलेने आपली बाजू न मांडल्याने न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. आता २७ ऑगस्टला सुनावणी पार पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news