Nashik Liquor Seizure | 'गटारी' पूर्वसंध्येला शोधमोहीम; दोन कोटींची दारू जप्त

Nashik Liquor Seizure |गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अवैध रीत्या आणला जात असलेला गोवानीर्मित तसेच मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेला तब्बल दोन कोटी १४ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अवैध रीत्या आणला जात असलेला गोवानीर्मित तसेच मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेला तब्बल दोन कोटी १४ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

Liquor
Nashik Nanduri highway Updates |नाशिक-नांदुरी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग; कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून थेट पाहणी

या कारवाईत १३ हजार ७२०.३२ बल्क लिटर विदेशी मद्यसाठा असून, त्यामध्ये १ हजार ५८८ बॉक्सचा समावेश आहे. मद्यसाठ्यासह बारा चाकी कंटेनर असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे गटारी अमावस्येच्या काळात परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 'ब' विभागाला मंगळवारी (दि. ११) गुप्त बातमीदारांमार्फत नंदिनी नदीच्या पुलाजवळ, मुंबई-आग्रा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर, मुंबई नाका परिसरात परराज्यातील विदेशी मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला.

Liquor
Nashik Phata Pimpri Highway Encroachment: नाशिक फाटा-पिंपरी महामार्गावर अतिक्रमणांचा विळखा; ‘महामार्ग की बाजारपेठ?’ असा सवाल उपस्थित

माहितीतील वर्णनानुसार लाल-हिरव्या रंगाचा टाटा कंपनीचा बारा चाकी कंटेनर येताना दिसताच पथकाने तो थांबविला. चालकाची चौकशी केली असता वाहनामध्ये ब्रास वॉल असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र विक्रीस प्रतिबंधित असलेला गोवानीर्मित तसेच मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेला मोठ्या प्रमाणातील विदेशी मद्यसाठा आढळून आला.

या प्रकरणी वाहनचालक रमेशकुमार पुरखाराम विश्नोई (३१, रा. अणदनियो ढाणी, मानकी, गुडामालानी, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले.
मद्यसाठा वाहून नेणारा (के.ए. २२-सी-३८९२) बारा चाकी कंटेनरही जप्त करण्यात आला. वाहनाचा मालक तसेच अन्य संशयित फरार असल्याचे विभागाने नमूद केले आहे.

Liquor
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील 123 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कायम सेवेचा मार्ग मोकळा!

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, अधीक्षक भुंकन साहेब आणि उपअधीक्षक अमृत तांबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. निरीक्षक आर. जे. पाटील, दुय्यम निरीक्षक जाधव, जी. जी. अहिरराव, पी. पी. वाघ, सहायक दुय्यम निरीक्षक एस. के. शिंदे, जवान वीरेंद्र वाघ, महेश सातपुते, प्रवीण अस्बले, विजेंद्र चव्हाण आणि महिंद्र भोये यांनी केली. पुढील तपास निरीक्षक आर. जे. पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news