Maratha Andolan : मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड

Maratha Andolan : मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड

Published on

चांदवड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ;  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता मराठा बांधव रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलनाचे पडसाद आता ग्रामीण भागातील खेडोपाडी उमटत आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण दयावे या मागणीसाठी चांदवड तालुक्यातील निंबाळे पंचक्रोशीतील संतप्त मराठा समाज आक्रमक झाला आहे.

येथील समाज बांधवानी आज सकाळी 8 वाजेपासून मनमाड लासलगाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे मनमाड लासलगाव रस्त्यावर दोन ते अडीच किमी अंतरावर वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे प्रवाश्यांचे मोठे हाल झाले आहे. या ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आंदोलनकर्त्याना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आक्रमक झाले असून जोपर्यंत सकल मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही तोवर ठिय्या सुरूच राहणार असल्याचा निश्चय मराठा समाजाने घेतला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news