Nashik Manmad Satane Karhi dacoity robbery |मनमाडजवळील सटाणे कऱ्ही त दरोडा, सहा जण गंभीर जखमी, रोकडसह सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट

Manmad Satane Karhi dacoity robbery |मनमाडजवळील सटाणे कऱ्ही त दरोडा, सहा जण गंभीर जखमी, रोकडसह सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट
Manmad Satane Karhi dacoity robbery
Manmad Satane Karhi dacoity robbery
Published on: 
Updated on: 

मनमाड : शहरापासून जवळ ग्रामीण भागात दरोडेखोरांच्या टोळक्याने मध्यरात्री हत्यारे घेऊन धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी पाच घरांतील लोकांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. यात एका वृद्धेचा समावेश आहे. रोख रकमेसह दागिन्यांची लूट केली. सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मनमाडपासून सात किलोमीटरवरील सटाणे, कही भागात सात ते आठ दरोडेखोरांनी सर्वप्रथम साईनाथ दराडे यांच्या घराचा दरवाजा तोडत लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी साईनाथ दराडे आणि अरुणा दराडे यांना मारहाण केली. त्यांनी भांडी फेकत चोरट्यांचा प्रतिकार केला. पाच मिनिटे हा संघर्ष सुरू होता. कुटुंबाचा प्रतिकार पाहून चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर सटाणा भागातील लहिरे वस्तीला लक्ष्य केले.

अमोल व ज्योती लहिरे यांनी दरवाजा आतून रोखून धरल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. तेथून पळालेल्या चोरट्यांनी पवार वस्तीवरील कुसुमबाई पवार यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकावले. विरोध करणाऱ्या कुटुंबीयांना मारहाण करत मोबाइलची तोडफोड केली. या हल्ल्यात दिलीप पवार गंभीर जखमी झाले.

त्यानंतर चोरट्यांनी मोरे वस्तीवरील शिवाजी मोरे यांना मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या रंजनाबाई मोरे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने त्यांना ४० टाके पडले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे-जखमींवर मालेगाव आणि नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

Manmad Satane Karhi dacoity robbery
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका स्वीकृत नगरसेवकपद निवडणूक; काँग्रेसने दाखल केलेला अकरावा अर्ज छाननी समितीतून अधिकृतपणे फेटाळला

जखमींची नावे अशी

दरोडेखोरांच्या हल्ल्यात साईनाथ दराडे, अरुणा दराडे, आशाबाई पवार, दिलीप पवार, शिवाजी मोरे, रंजनाबाई मोरे हे जखमी झाले आहेत. यातील रंजनाबाई मोरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Manmad Satane Karhi dacoity robbery
Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.