Manmad Indore Railway Land Survey| रेल्वेमार्ग जमीन मोजणी लांबणीवर

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हद्द निश्चितीचे काम रखडले; पुढील आदेशानंतर पोलिस बंदोबस्तात मोजणी
Land survey
Land survey
Published on: 
Updated on: 

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

मनमाड - इंदूर रेल्वेमार्गासाठी मालेगाव तालुक्यातील १६ गावांमधील सुमारे २८५ हेक्टर जमिनीची बुधवार (दि. २५) पासून सुरू होणारी संयुक्त मोजणी शेतकऱ्यांचा विरोध आणि हद्द निश्चितीची (डिमार्केशन) प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे तूर्त स्थगित करण्यात आली. हद्द निश्चितीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणी केली जाणार आहे.

प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि. २३) पोलिस नियंत्रण कक्षात झाली होती. या बैठकीत शेतकऱ्यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याची तसेच जमिनीचे बाजारभावानुसार मूल्यांकन करून योग्य मोबदला देण्याची मागणी केली होती. मागण्या मान्य झाल्याशिवाय जमीन मोजणी होऊ देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यातच मोजणीपूर्वी आवश्यक असलेली हद्द निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे प्रशासनाने मोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हद्द निश्चितीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मोनार्क एजन्सीला देण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर संयुक्त मोजणीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात होणार ३६३ हेक्टर जमीन संपादन

मनमाड - इंदूर रेल्वेमार्गामुळे उत्तर महाराष्ट्र हा मध्य प्रदेशाशी जोडला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व नांदगाव तालुक्यांमध्ये एकूण ३६३ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी नांदगाव तालुक्यामधील सहा गावांमधील ७८ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

Land survey
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

दोन टप्प्यांत मोजणीचे नियोजन

मालेगाव तालुक्यातील १६ गावांमध्ये दोन टप्प्यांत जमीन मोजणी करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात चोंढी, जळगाव निंबायती, काळेवाडी, घोडेगाव, घोडेगाव चौकी, वहऱ्हाणे, मेहुणे, ज्वार्डी बुद्रुक, ज्वार्डी खुर्द आणि येसगाव बुद्रुक या गावांतील जमिनीची मोजणी प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात माल्हणगाव, सवंदगाव, सायने बुद्रुक, चिखलओहोळ, देवारपाडे आणि झोडगे या गावांमध्ये मोजणी केली जाणार आहे. मात्र, हद्द निश्चितीचे काम पूर्ण होणे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पुढील कार्यवाही होणे यावर मोजणीची प्रक्रिया अवलंबून राहणार आहे.

Land survey
Kumbhamela | सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी भुसावळ रेल्वे विभागाचे 'मेगा प्लॅनिंग'; नाशिक परिसरातील पाच स्थानकांचा १,६३० कोटींचा कायापालट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.