Manmad Accident Case| मनमाडजवळ कार-कंटेनरचा भीषण अपघात; दोन महिलांसह चौघांचा मृत्यू

Manmad Accident Case| मनमाडजवळ घटना : मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश; अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक; सात जण गंभीर जखमी; श्रीरामपूर येथील लग्नसोहळा आटोपून परतताना घटना
Manmad Accident Case
Manmad Accident Case
Published on: 
Updated on: 

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर येथून लग्नसोहळा आटोपून मध्य प्रदेशात परतणाऱ्या कारला मनमाडजवळ पुणे-इंदूर महामार्गावरील अनकवाडे शिवारात शनिवारी (दि. २१) सकाळी भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, इतर सात जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येवला आणि मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Manmad Accident Case
Rahuri Sugarcane Farmers Protest: ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक; नगर-मनमाड महामार्गावर नऊ तास ठिय्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील काही नागरिक श्रीरामपूर येथील नातेवाइकांच्या लग्नसोहळ्यासाठी आले होते. लग्नसोहळा आटोपून शनिवारी सकाळी परत जात असताना अनकवाडे शिवारात त्यांची झायलो कार (एम.एच. १२, एफ.यू. ३७६४) आणि कंटेनर (एच.आर. ४७, एच. ७५५०) यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला.

अन्य तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, कंटेनर आणि कार दोन्ही वाहने उलटी झाली होती. कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. अपघात घडल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात, तर काहींना येवल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Manmad Accident Case
Manmad Marigold Flower Farming | दसरा-दिवाळीपूर्वीच बळीराजा संकटात! पावसाच्या दडीमुळे मनमाड परिसरात झेंडूची शेती करपली

उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कली मुन्नीसा कमाल अहमद (३५), हाफिसजुंनीसा अब्दुल हकीम (२०), निझाम नियाज शेख (२४, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), शबिना कल्लू शेख (२०, रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

जखमींची नावे अशी

  • मोहंमद अहसाण कमाल अहमद (५७)

  • मोहम्मद झिशान कमाल अहमद

  • रिझवान अहमद शकील अहमद (३७)

  • चांद बाबू हसीम अली (१४)

  • शमीम अब्दुल शेख (चालक)

  • नसिबुनिसा अब्दुल हकीम (५५)

  • कांशीराम भगवानसिंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.