Maharashtra politics : माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात

सदनिका घोटाळा : जिल्हा सत्र न्यायालयातही 2 वर्षांची शिक्षा कायम
Manikrao Kokate
माणिकराव कोकाटे(Pudhari Photo)
Published on
Updated on

नाशिक : सभागृहात रम्मी खेळण्याने कृषी खाते गमावलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे 30 वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. हा निकाल मंत्री कोकाटेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आले आहे. दरम्यान, विरोधकांकडून मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

Manikrao Kokate
Maharashtra politics : महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शशिकांत शिंदे म्हणाले, "दिल्लीने परवानगी..."

मंत्री कोकाटे गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच अडचणीत आले आहेत. विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना मोबाईलमध्ये पत्त्याचा गेम, रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, आपण रम्मी खेळत नव्हतो. मोबाईलवर ते पॉपअप आल्याचे सांगत त्यांनी हात झटकले होते. त्यांच्याकडून कृषी मंत्रिपदाचा पदभार काढून त्यांना क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यातच सदनिका घोटाळाप्रकरणी न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षे कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. क्रीडामंत्री कोकाटे यांना यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करत लाटल्या प्रकरणात मंत्री ॲड. कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांकडून मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यावेळी या शिक्षेला आव्हान देत कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे मंत्री कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार ाकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी कोकाटे यांना पुन्हा एकदा संबंधित प्रकरणात शिक्षा सुनावल्याने कोकाटे यांच्या अडचणी कायम राहिल्या आहेत.

सदनिका घोटाळा 30 वर्षांपूर्वींचा...

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात मंत्री कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चारजणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी या प्रकरणात नाशिक न्यायालयाने मंत्री कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

Manikrao Kokate
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी भूमिका घेतल्यानेच 2022 मध्ये भाजप सत्तेत आली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news