Black Magic Case | मुंगसे फार्महाउसवर जादूटोणा विधीचा पर्दाफाश

Black Magic Case | महिलेसह ९ जण ताब्यात, मालेगाव तालुका पोलिसांची मोठी कारवाई
Black Magic Fraud
Black Magic FraudPudhari File Photo
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मुंगसे गावाच्या हद्दीतील एका फार्महाउसवर कथित जादूटोणा व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत नऊ संशयितांना अटक केली असून, एक जण फरार झाला आहे.

Black Magic Fraud
Paithan Crime : पैठण पोलिस ठाणे, रुग्णालयात संतप्त नातेवाइकांचा ठिय्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जूनच्या रात्री मुंगसे येथील 'एला फार्म' येथे काही व्यक्ती जादूटोण्याचे विधी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तातडीने छापा टाकला. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून जादूटोण्यात वापरले जाणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले.

त्यामध्ये लिंबू, हिरवी काठी, हळद, कुंकू, लाल व काळ्या दोऱ्यात ओवलेले लिंबू, काळी उडीद, अगरबत्ती, मोहरी, तांब्याची भांडी तसेच विविध रंगांचे कापड आदी वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सात जण मालेगावचे असून, उर्वरित आरोपी नाशिक, पुणे, नांदगाव आणि साकोरी येथील आहेत.

Black Magic Fraud
Kosari Double Murder Case : साक्ष द्यायला निघाला... अन्‌‍ जिवाला मुकला

अटक झालेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सर्व आरोपींना मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार झालेल्या एका संशयिताचा पोलिस शोध घेत असून, मालेगाव तालुका पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

खरात प्रकरणाची पुन्हा चर्चा

जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात संपूर्ण राज्याला हादरवणारे खरात प्रकरण ताजे असतानाच मालेगाव तालुक्यात पुन्हा अशा प्रकारे भोंदूगिरीचा प्रयत्न समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भोंदूगिरीच्या घटनांमधून महिलाचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार उघड होत असल्याने नागरिकांनी भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news