Malegaon Plot Scam | भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मालेगावचे तत्कालिन प्रांताधिकारी निलंबित

महसुलमंत्री बानवकुळेंचा आदेश; आठ मुद्रांक अधिकार्‍यांची चौकशी
महसुलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे
महसुलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे
Published on
Updated on

नाशिक : मालेगाव तालुक्यातील संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पाऊल उचलत, तत्कालिन उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना तडकाफडकी निलंबित केले. शिवाय आठ मुद्रांक अधिकार्‍यांवर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी विधानसभेत दिली. यावेळी स्टॅम्प वेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आ. गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नात मौजे संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्र. 144 अ आणि मौजे गुगळगाव येथील गट क्र. 253 यांच्या बिनशेती परवानगीशिवाय झालेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. 2002 च्या परिपत्रकानुसार, भूखंड किंवा शेतीच्या अदलाबदलीसाठी जमिनी सलग असणे आवश्यक आहे. परंतु, प्रांताधिकारी किसवे यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप करून नियमांचा भंग केला. यामुळे त्यांना निलंबित करत एका महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी यावेळी दिले.

महसुलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे
Nashik Fraud News | भूखंड घोटाळ्याची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी

स्टॅम्पवेंडरवर फौजदारी कारवाई

आ. पडळकर यांनी विधानसभेत गंभीर आरोप करताना सांगितले की, एका जमिनीचे 16 विभाग आणि 272 तुकडे करून तुकडेबंदी कायदा तसेच एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. 2013 ते 2019 या काळात एकूण 258 अनधिकृत दस्तनोंदणी झाली. या प्रकरणात मुद्रांक अधिकारी भुरके, गावित, कापडण्या, गुप्ते, हिरे, कळसकर, मोतीराळे आणि वाणी यांनी चुकीच्या पद्धतीने दस्तनोंदणी करून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचे उघड झाले आहे. या आठ अधिकार्‍यांविरुद्ध प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. तसेच, या गैरव्यवहारात स्टॅम्प वेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांचाही सहभाग आढळून आला असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सभागृहात ठामपणे जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news