Nashik- मालेगावी १० खासगी रुग्णालयांना मनपाच्या नोटिसा; रुग्ण हक्क सनद, उपचारांचे दरपत्रक लावण्याचे निर्देश

मालेगावी १० खासगी रुग्णालयांना मनपाच्या नोटिसा
Nashik- मालेगावी १० खासगी रुग्णालयांना मनपाच्या नोटिसा; रुग्ण हक्क सनद, उपचारांचे दरपत्रक लावण्याचे निर्देश
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

मुंबई नर्सिंग होम कायद्यातील तरतुदींनुसार रुग्ण हक्क सनद व उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागात न लावणाऱ्या शहरातील १० खासगी रुग्णालयांना मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजाविल्या आहेत. रुग्णांना उपचार व शुल्काची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित फलक तातडीने लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई नर्सिंग होम अॅक्ट १९४९ तसेच २०२१ मधील संबंधित सुधारित तरतुदींनुसार महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने व सोनोग्राफी केंद्रांमध्ये रुग्ण हक्क सनद (Patients Charter) आणि उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने मनपा आरोग्य विभागाने शहरातील विविध वैद्यकीय आस्थापनांची तपासणी केली. त्यावेळी काही रुग्णालयांमध्ये आवश्यक फलक लावण्यात आले नसल्याचे आढळून आले.

Nashik- मालेगावी १० खासगी रुग्णालयांना मनपाच्या नोटिसा; रुग्ण हक्क सनद, उपचारांचे दरपत्रक लावण्याचे निर्देश
Nashik land acquisition compensation for affected farmers- प्रलंबित भूसंपादन भरपाईचा मार्ग मोकळा

या कारवाईत एम्स हॉस्पिटल, इकरा हॉस्पिटल, साईसेवा हॉस्पिटल, दिया आय केअर, पवार हॉस्पिटल संकल्प हॉस्पिटल, मनश्री हॉस्पिटल, शिवम हॉस्पिटल, जाजू हॉस्पिटल आणि आशीर्वाद डे-केअर या १० आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

रुग्णांना उपचारांबाबत आवश्यक माहिती मिळणे आणि उपचारांच्या शुल्काबाबत पारदर्शकता राहणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावलेले नसणे ही बाब गंभीरपणे घेतली जात असल्याचे मनपा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Nashik- मालेगावी १० खासगी रुग्णालयांना मनपाच्या नोटिसा; रुग्ण हक्क सनद, उपचारांचे दरपत्रक लावण्याचे निर्देश
Nashik Nampur students drown in Mosam River |नामपुरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू

तातडीने फलक लावण्याचे आवाहन

शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, रुग्णालये, दवाखाने व सोनोग्राफी केंद्रांनी रुग्ण हक्क सनद आणि उपचारांचे दरपत्रक तातडीने दर्शनी भागात लावावे, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले आहे. यापुढील तपासणीत संबंधित फलक आढळून न आल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news