Molestation Case Nashik | शिक्षकी पेशाला काळिमा! हिंदीच्या पेपरवेळी विद्यार्थिनीशी गैरवर्तन; एम.एस.जी. महाविद्यालयातील संतापजनक प्रकार

Molestation Case Nashik | विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
teacher misconduct
विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्यास शिक्षक होणार तत्काळ बडतर्फfile photo
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पर्यवेक्षक वाजिदअली कमरअली (रा. रौनकाबाद, मालेगाव) याच्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

teacher misconduct
Nashik Politics |'गटबाजी खपवून घेणार नाही'; शशिकांत शिंदेंचा नाशिकमधील कार्यकर्त्यांना सज्जड दम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ४) सकाळी हिंदी विषयाच्या परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थिनी वर्गात पेपर लिहीत असताना इतर विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेला वाजिदअली याने विद्यार्थिनीच्या खांद्यावर हात ठेवून अयोग्य वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक विजया पवार अधिक तपास करीत आहेत.

teacher misconduct
TCS Harassment Case | नाशिक टीसीएस लैंगिक शोषण प्रकरण: आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; निदा खान अजूनही फरार

या घटनेनंतर महाविद्यालयीन परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अधिक कडक देखरेख, सीसीटीव्ही यंत्रणा आणि तक्रार निवारण प्रणाली सक्षम करण्याची मागणी पुढे येत आहे.

महिला सुरक्षेचे वाढते आव्हान

राज्यात शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यस्थळांवरील महिलांविरोधातील छेडछाड व गैरवर्तनाच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, केवळ कठोर कायदे पुरेसे नसून प्रतिबंधात्मक उपाय, संवेदनशीलता प्रशिक्षण आणि तातडीच्या तक्रार निवारण व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news