Malegaon Politics 2026 | महापौर, उपमहापौरांनी स्वीकारला पदभार

Malegaon Politics 2026 | जन्मदाखला, शहर स्वच्छतेला प्राधान्याचा निर्धार
Malegaon Mayor Election
Malegaon Mayor Election
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या नव्या कारभाराला बुधवारी (दि. ११) औपचारिक सुरुवात झाली. नवनिर्वाचित महापौर नसरीन शेख व उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पदभार स्वीकारला. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी पुष्पगुच्छ देत दोर्धीकडेही पदभार सुपूर्द केला.

Malegaon Mayor Election
Janori Kumbh Mela 2026 | जानोरीत कुंभपर्वणीची जोरदार तयारी

पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महापौर नसरीन शेख यांनी शहरातील नागरिकांशी निगडित असलेल्या जन्म दाखल्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर असल्याच्या दाव्यांवरून मागील काही काळात शहरातील अनेक नागरिकांचे जन्म दाखले रद्द करण्यात आले होते.

कायद्याच्या चौकटीत ज्या जन्म दाखल्यांची रद्दबातलता झाली आहे, त्या प्रकरणांचा सखोल आढावा घेऊन योग्य ते निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि. १८) होणाऱ्या महासभेत हा विषय मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्ते या शहराच्या मूलभूत सुविधांवर महासभेत चर्चा करून शहरहिताचे ठोस निर्णय घेतले जातील, असा निर्धार महापौर शेख यांनी व्यक्त केला. शहरातील सामान्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पदभार स्वीकारताना विकासकामांबाबत आपली दिशा स्पष्ट केली.

महानगरपालिकेतील प्रलंबित विकासकामांना गती देणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या शाळांना आधुनिक स्वरूप देऊन विद्यार्थी संख्या वाढविणे, दर्जेदार शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, मालेगाव महापालिकेतील महापौर निवडणूक अलीकडील काळातील सर्वाधिक चुरशीची ठरली. ८४ सदस्यांच्या महासभेत झालेल्या मतदानात इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख यांनी शिवसेनेच्या विरोधी उमेदवार लता घोडके यांचा २५ मतांनी पराभव करीत महापौरपद पटकाविले.

उपमहापौरपदी समाजवादी पक्षाचे शान-ए-हिंद यांची निवड झाली. या निवडणुकीत विविध पक्षांच्या राजकीय गणितांनी निर्णायक भूमिका बजाविली. पदभार स्वीकार समारंभास उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, हेमलता डगळे, पल्लवी शिरसाठ, गटनेते खालीद शेख, माजी महापौर ताहेरा शेख, समाजवादी पक्षाचे गटनेते मुस्तकीम डिग्निटी, असलम अन्सारी, शकील जानीवेग, फकिरा शेख, सलीम अन्वर यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सत्तांतरानंतर नव्या नेतृत्वाकडून शहरातील प्रलंबित प्रश्नांवर ठोस व परिणामकारक निर्णय होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Malegaon Mayor Election
Nashik Zilla Parishad | नवीन इमारतीत स्थलांतरासाठी दबावतंत्र ?

अपेक्षापूर्तीचे आव्हान

महापौर, उपमहापौर दोन्ही महिला असल्यामुळे प्रामुख्याने स्वच्छता व महिलांच्या अडचणी त्यांना ज्ञात आहेत. मालेगाव सेक्युलर फ्रंटला ४० जागा मिळाल्या आहेत. या आघाडीकडून शहरवासीयांना दैनंदिन स्वच्छता, पाणीप्रश्न यासह सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व विविध विकासकामांच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षापूर्तीचे ओझे नूतन पदाधिकाऱ्यांवर असतानाच महापालिकेची आर्थिक स्थिती हा कळीचा मुद्दा असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news