Mahavitran News | खासगी माणसांकडून काम करून घेतले तर थेट बडतर्फी! महावितरणचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

Mahavitran News | अशी तांत्रिक व जोखीमची कामे करवून घेण्यासाठी कोणत्याही खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करू नये.
Mahavitran News
Mahavitran NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरण वीजयंत्रणेमधील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, वीजबिल वसुली किंवा मीटर काढणे यासारखी कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून करण्याची पूर्णतः जबाबदारी तारमार्ग संवर्गातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहेत. अशी तांत्रिक व जोखीमची कामे करवून घेण्यासाठी कोणत्याही खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करू नये.

Mahavitran News
Nashik Zilla Parishad | नाशिक जिल्हा परिषदेवर धडकणार योजना कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा; किमान वेतनासह सामाजिक सुरक्षेची मागणी

असे प्रकार आढळून आल्यास व अपघात झाल्यास संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध बडतल्फीसारखी कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला. याबाबत संचालक (संचालन) धनंजय औंधेकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे हे प्रत्येक संबंधित अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गामध्ये प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

Mahavitran News
Kalika Mata Yatra | नाशिक कालिकामाता नवरात्र उत्सव: रहाटपाळण्याच्या जागेचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात!

या कर्मचाऱ्यांवर नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीमधील बिघाड शोधणे, वीज पुरवठ्याच्या ग्राहक तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसुली करणे आणि थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणणे यासारख्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. महावितरणचे काही तारमार्ग कर्मचारी ही कामे स्वतः करण्याऐवजी खासगी व्यक्ती/अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news