SIR Final Voter List | 'एसआयआर' सुधारित वेळापत्रक जाहीर! 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम मतदारयादी

SIR Final Voter List |सुधारित वेळापत्रक जाहीर : दावे-हरकती दाखल करण्यास 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत
SIR voter list
SIR voter listpudhari photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी (एसआयआर) सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नवमतदारांसाठी १ ऑक्टोबर ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे. दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

SIR voter list
Nashik Ganesh Visarjan | नाशिक जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत कलम 163 लागू; विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्सवर पूर्णपणे बंदी!

भारत निवडणूक आयोगाचे सचिव पवन दिवाण यांनी शनिवारी (दि.२६) महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सुधारित वेळापत्रक कळवले. त्यानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर असा आहे. दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच त्यांची निकाली काढण्याची कारवाई ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येईल.

त्यानंतर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, मतदारांनी या पुनरीक्षण प्रक्रियेत आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असेही आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news