Nashik Municipal Corporation | 'पीएम स्वनिधी 2.0' मध्ये महाराष्ट्राची उत्तुंग भरारी; पथविक्रेत्यांच्या कर्जवाटपात देशात तिसरा क्रमांक!

Nashik Municipal Corporation | 'पीएम स्वनिधी २.०'ची प्रभावी अंमलबजावणी ; २.९६ लाख पथविक्रेत्यांना कर्ज ; देशात नाशिक १४व्या स्थानी
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : आसिफ सय्यद
रस्त्याच्या कडेला छोटा व्यवसाय उभारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या 'पीएम स्वनिधी' योजनेच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Pothole Issue | नाशिक खड्डेप्रकरणी मनपा आयुक्तांचा मोठा दणका; शहर अभियंत्यांसह 36 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

'पीएम स्वनिधी २.०' योज अंतर्गत राज्यातील तब्बल २.९६ लाख पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आले असून, या कामगिरीसह महाराष्ट्राने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या गुजरातपेक्षाही महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली आहे.


दरम्यान, नाशिक महापालिकेनेही या योजनेत लक्षणीय कामगिरी नोंदवली असून, १५ हजार ५० पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे नाशिकने देशातील महापालिका व शहरांच्या क्रमवारीत १४ वे स्थान, तर महाराष्ट्रात चौथे स्थान मिळविले आहे. देशातील तरुणांना स्वावलंबी करून, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे पीएम स्वनिधी योजना राबविली जात आहे.

या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना व्यवसायासाठी केंद्र ५० हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून तब्बल ९ कोटी १६ लाख ४७ हजार ४५६ पथविक्रेत्यांना, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील ५२,२०१ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आले होते.

उत्तर प्रदेश देशात अव्वल

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पथविक्रेत्यांना कर्ज मंजुरीत उत्तर प्रदेश देशात आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात तब्बल ४ लाख ६९ हजार २६२ पथविक्रेते कर्जासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ३ लाख ५८ हजार ३२२ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. देशात दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, मध्य प्रदेशात ४ लाख २६ हजार ८०५ पथविक्रेते पात्र ठरले, तर ३ लाख १२ हजार ८०२ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. गुजरात पथविक्रेत्यांच्या कर्जवाटपात चौथ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये २ लाख १६ हजार १४८ पथविक्रेते पात्र ठरले, तर १ लाख ४९ हजार ३०६ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

नाशिक शहरातील आकडेवारी

  • अर्ज पात्र: २०,७६६

  • मंजूर अर्ज: १५,०५०

  • कर्ज वाटप: १४,७६५

नाशिकमध्ये २० हजार ७६६ अर्ज पात्र

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २० हजार ७६६ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी १५ हजार ५० अर्ज मंजूर झाले असून, १४ हजार ७६५ पथविक्रेत्यांना प्रत्यक्ष कर्जवाटप करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे नाशिक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चौथ्या क्रमांकावर असून, देशातील क्रमवारीत १४ व्या स्थानावर आहे.

मुंबई आघाडीवर, संभाजीनगर दुसरे

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पथविक्रेत्यांना कर्जवाटप करण्यात बृहन्मुंबई महापालिका आघाडीवर आहे. मुंबईत ५७ हजार ८९२ पात्र अर्जांपैकी ३५ हजार ४५ मंजूर अर्ज असून, ३३ हजार ६ लाभार्थ्यांना कर्जवाटप झाले आहे. देशाच्या क्रमवारीत मुंबईचा चौथा क्रमांक आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे २७ हजार ८२२ पात्र अर्जांपैकी २२ हजार ७४ अर्ज मंजूर झाले आहेत.

त्यापैकी २१ हजार ३७ लाभार्थ्यांना कर्जवाटप झाले आहे. देशात संभाजीनगर आठव्या स्थानी आहे. सोलापूर येथे १५ हजार ७२५, नाशिक येथे १४ हजार ७६५, तर नागपूर येथे १४ हजार १११ पथविक्रेत्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. नांदेड - वाघाळा येथे १० हजार २३०, परभणी येथे ९ हजार २४१, पुणे येथे ८ हजार २१० आणि ठाणे येथे ८ हजार २८२ पथविक्रेत्यांना कर्ज मिळाले आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik-Pune Railway | नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी गोंदे फाट्यावर जनसागर; समृद्धी महामार्गही आंदोलकांनी रोखला!

महाराष्ट्रातील सव्वाचार लाख पथविक्रेते पात्र

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील योजनेअंतर्गत ४ लाख २५ हजार ८६ पथविक्रेत्यांचे अर्ज पात्र ठरले. त्यापैकी २ लाख ९६ हजार २०८ अर्ज मंजूर झाले असून, २ लाख ८५ हजार ७७२ पथविक्रेत्यांना प्रत्यक्ष कर्जवाटप करण्यात आले आहे. उर्वरित पथविक्रेत्यांना लवकरच कर्ज मंजूर करून वाटप केले जाणार आहे. पथविक्रेत्यांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.

१० मराठी हेडिंग्ज (SEO-Friendly + Human Interest):

  1. गुजरातलाही टाकले मागे! महाराष्ट्रातील सव्वादोन लाखांहून अधिक पथविक्रेत्यांना 'पीएम स्वनिधी'चे बळ

  2. नाशिक मनपाची कामगिरी जोरदार; 'पीएम स्वनिधी' कर्जवाटपात देशात १४ वे, तर राज्यात ४ थे स्थान

  3. उत्तर प्रदेश देशात अव्वल, तर मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर; पीएम स्वनिधी योजनेतील राज्यांची आकडेवारी जाहीर

  4. मुंबई आघाडीवर, तर छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या स्थानी! महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील कर्जवाटपाचा अहवाल

  5. पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी ५० हजारांपर्यंत बिनव्याजी कर्ज; केंद्र सरकारची 'पीएम स्वनिधी २.०' ठरतेय वरदान

  6. नाशिकमधील १४,७६५ पथविक्रेत्यांच्या हाती प्रत्यक्ष कर्ज; स्वबळावर व्यवसायासाठी मोठा हातभार

  7. छोट्या व्यवसायिकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे स्वप्न साकार; महाराष्ट्रातील २.८५ लाख लाभार्थ्यांना कर्ज

  8. संभाजीनगर देशात ८ व्या स्थानी! पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत २१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक पाठबळ

  9. महाराष्ट्रात ४.२५ लाख पथविक्रेते पात्र; उर्वरित अर्जांवरही लवकरच कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणार

English Keywords:

  • PM SVANidhi 2.0 Maharashtra third rank India news

  • Nashik Municipal Corporation PM SVANidhi performance rank 14

  • PM SVANidhi street vendor loan scheme Maharashtra statistics

  • Mumbai Sambhajinagar PM SVANidhi ranking Maharashtra

  • Uttar Pradesh Madhya Pradesh PM SVANidhi street vendors report

English Hard Slug:

maharashtra-ranks-third-in-india-under-pm-svanidhi-2-0-nashik-secures-14th-spot

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news