Cattle Population Decline | राज्यात गोवंशीय पशुधनात 17.7 टक्के घट

Cattle Population Decline | 21 व्या पशुगणनेतून धक्कादायक आकडेवारी समोर
Mangaon Cattle Theft
Mangaon Cattle TheftFile Photo
Published on: 
Updated on: 

पुढारी विशेष : आसिफ सय्यद, प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या पशुधनाच्या संख्येत गेल्या पशुगणनेच्या तुलनेत मोठी उलथापालथ झाल्याचे २१ व्या पशुगणनेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. २० व्या पशुगणनेच्या तुलनेत २१ व्या पशुगणनेत राज्यातील गोवंशीय पशुधन १७.७ टक्क्यांनी, म्हशी २१ टक्क्यांनी आणि शेळ्या १४.५ टक्क्यांनी कमी झाल्या.

Mangaon Cattle Theft
Nashik ZP Employee Bank | नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बँकेवर अखेर प्रशासक मंडळ! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

राज्यात गाय, म्हैस आणि शेळी या तिन्ही प्रमुख पशुधन घटकांची संख्या घटली असताना, मेंढ्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. मेंढ्यांची संख्या ५.८ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, पशुधनातील ही घट सर्व विभागांमध्ये सारखी नसून, विदर्भ आणि मराठवाड्यात गोवंश व म्हशींची घट अधिक तीव्र, तर काही भागांत मेंढ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.

राज्यातील गोवंश संख्येतील घट विशेष लक्षवेधी आहे. २० व्या पशुगणनेत राज्यात १३९.९३ लाख गोवंश होता. २१ व्या पशुगणनेत ही संख्या ११५.०८ लाखांवर आली. म्हणजेच एका पशुगणना कालावधीत सुमारे २४.८५ लाखांची घट झाली.

म्हशींची संख्याही ५६.०४ लाखांवरून ४४.२६ लाखांवर आली. शेळ्यांची संख्या १०६.०४ लाखांवरून ९०.६७ लाखांवर घसरली. याउलट मेंढ्यांची संख्या २६.८० लाखांवरून २८.३५ लाखांवर पोहोचली. त्यामुळे पशुधनातील बदल केवळ संख्यात्मक नसून, कोणत्या प्रकारच्या पशुधनाचे प्रमाण वाढते किंवा घटते आहे, यामध्येही महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे स्पष्ट होते.

मराठवाड्यात गोवंशाल सर्वाधिक फटका:

छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागातील आकडेवारी पाहिल्यास गोवंशाच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसते. छत्रपती संभाजीनगर विभागात गोवंश २७.९ टक्क्यांनी, तर लातूर विभागात २९.५५ टक्क्यांनी घटला. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये गोवंशाची संख्या घटली असून, घट २४.५ ते ३४.८ टक्क्यादरम्यान आहे. लातूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये २५.४ ते ३४.८ टक्क्यांपर्यंत घट नोंदली आहे. म्हशींच्या बाबतीतही याच भागात मोठी घट दिसते. छत्रपती संभाजीनगर विभागात २५.९ टक्के, तर लातूर विभागात २३.१ टक्के घट झाली आहे.

विदर्भात गोवंश घटला; मेंढ्यांची संख्या मात्र वाढली:

अमरावती विभागातील चित्र विशेष विरोधाभासी आहे. गोवंतात २९.६ टक्के आणि म्हशींमध्ये २१.४ टक्के घट झाली असताना, मेंढ्यांची संख्या तब्बल ४०.७ टक्क्यांनी वाढली आहे. अकोला जिल्ह्यात मेंढ्यांची संख्या २३७.६ टक्क्यांनी वाढल्याची नोंद आहे. दुसरीकडे वाशीममध्ये मेंढ्यांची संख्या १७.६ टक्क्यांनी घटली. नागपूर विभागात हा विरोधाभास आणखी तीव्र आहे. गोवंशात २७.४ टक्के आणि म्हशींमध्ये २३.८ टक्के घट झाली असताना, शेळ्यांमध्ये ७.९ टक्के आणि मेंढ्यांमध्ये तब्बल ९१.१ टक्के वाढ झाली.

नाशिक विभागात शेळ्यांची संख्या घटली:

नाशिक विभागातील गोवंशाची घट ८ टक्के असून, ती राज्यातील इतर अनेक विभागांच्या तुलनेत कमी आहे. मात्र म्हशींमध्ये १३.९ टक्के आणि शेळ्यांमध्ये तब्बल १८.४ टक्के घट झाली आहे. जिल्हानिहाय चित्रातही मोठी तफावत आहे. गोवंशात अहिल्यानगरमध्ये केवळ ३.५ टक्के घट झाली असताना, धुळ्यात १७ टक्के घट झाली. शेळ्यांमध्ये नंदुरबारमध्ये ३.८ टक्के घट झाली, तर अहिल्यानगरमध्ये ही घट २९ टक्क्यांपर्यंत पोहोचली. मेंढ्यांबाबतही नाशिक विभाग एकसंघ चित्र दाखवत नाही. धुळ्यात ४.६ टक्के वाढ झाली असताना जळगावमध्ये ३१.९ टक्के घट झाली.

Mangaon Cattle Theft
Nashik Fodder Crisis | नाशिक जिल्ह्यावर चाराटंचाईचे सावट! खरीप कडबा आणि पेंढ्याचे उत्पादन घटण्याची भीती

पुणे विभागात गोवंशाचे चित्र वेगळे:

राज्यातील बहुतांश विभागांमध्ये गोवंश घटत असताना, पुणे विभागात गोवंशाची संख्या तुलनेने स्थिर राहिली आहे. मात्र म्हशींच्या संख्येत २१.७ टक्के आणि शेळ्यांमध्ये २५.८ टक्के घट झाली. यांच विभागात जिल्हानिहाय फरकही स्पष्ट आहे. कोल्हापुरात गोवंशाची संख्या ७.२ टक्क्यांनी वाढली, तर पुणे जिल्ह्यात ५ टक्के घट झाली. शेळ्यांच्या संख्येत कोल्हापुरात ५.७ टक्के वाढ झाली, तर सांगलीत ३३.६ टक्के घट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news