Maharashtra Farmer Loan | जूनपूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी?

Maharashtra Farmer Loan | राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी मागायला लागू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनादेखील केल्या जाणार आहेत.
Farmer Advisory Maharashtra
Kharif Crop Sowing(File Photo)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी मागायला लागू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनादेखील केल्या जाणार आहेत. त्यासाठी ३० जून २०२५ व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने बँकांकडून मागविली आहे.

Farmer Advisory Maharashtra
Valpoi Leopard Attack | सत्तरीत बिबट्याची दहशत! हल्ल्यात जखमी झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक जिल्हा बँकेने त्यांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार खात्याच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. तर दुसरीकडे सहकार विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार पुढील महिन्यात एप्रिलमध्येच सरकारकडून कर्जमाफी घोषणेची शक्यता आहे.

त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, या समितीचा अहवाल लवकरच शासनाला सादर होणार आहे.

Farmer Advisory Maharashtra
Sunetra Pawar vs Narhari Zirwal | पक्ष प्रतिमा जपा, प्रशासन बदनामी टाळा !

३० जून २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने मागविली असून, त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

माहितीच मिळेना

जिल्हा बँकेने त्यांच्याकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सरकार व सहकार खात्याने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन लिंकवर अपलोड केलेली आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी अशा प्रकारे थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार खात्याला दिली की नाही, याबाबत कोणतीच माहिती दिली जात नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news