Maharashtra Property Tax Exemption Circular | धार्मिक, धर्मादाय, शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करमाफी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणीचे शासन निर्देश
Maharashtra Property Tax Exemption Circular | धार्मिक, धर्मादाय, शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करमाफी
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धार्मिक, धर्मादाय आणि शैक्षणिक संस्थांच्या इमारतींना मालमत्ता करातून सूट देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यासाठी नगरविकास विभागाने शासन परिपत्रक जारी केले असून, राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना याबाबत सूचना दिल्या आहेत.

Maharashtra Property Tax Exemption Circular | धार्मिक, धर्मादाय, शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करमाफी
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

सन २०२३ मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी न्यायालयाच्या निर्णयानुसार आवश्यक सूचना दिल्या जातील, असे शासनाने सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने दि. १ मार्च २०२१ रोजी दिलेल्या आदेशात धार्मिक, धर्मादाय आणि शैक्षणिक कामांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या इमारतींना करातून सूट देण्याबाबत निर्णय दिला होता.

या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. त्यानुसार धार्मिक, धर्मादाय आणि शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करातून सूट देताना संबंधित कायदे, नियम आणि शासन निर्णयांमधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक केले आहे.

Maharashtra Property Tax Exemption Circular | धार्मिक, धर्मादाय, शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करमाफी
IFFI Goa| नाशिक आणि नागपूरमध्ये लवकरच नवी 'फिल्म सिटी' होणार

करमाफी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही निर्देश दिले आहेत. या परिपत्रकामुळे राज्यातील महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाला धार्मिक, धर्मादाय व शैक्षणिक संस्थांच्या मालमत्ता कर सवलतीचे निर्णय घेताना न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायदेशीर तरतुदींनुसारच कार्यवाही करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.