Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी 1,800 कोटींचा 'बूस्टर'

Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कामांसाठी सुमारे २४ हजार कोटींचा विकास आराखडा प्रशासनामार्फत शासनाला सादर करण्यात आला होता.
Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आर्थिक बळ मिळाले असून, सिंहस्थाच्या आवश्यक कामांसाठी आणखी १,८०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
सिंहस्थ कामांसाठी सुमारे २४ हजार कोटींचा विकास आराखडा प्रशासनामार्फत शासनाला सादर करण्यात आला होता.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Road Collapse | नाशिक शहरातील रस्त्यांची 'खोखली' मालिका अद्यापही सुरूच

या आराखड्याला अद्याप शासनाची मंजुरी मिळू शकली नसली तरी सिंहस्थ प्राधिकरणाच्या माध्यमातून महापालिकेसह विविध शासकीय यंत्रणांद्वारे नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्हाभरात सुमारे ३० हजार कोटींची सिंहस्थ कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी यापूर्वी विविध टप्प्यांत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात अनुक्रमे २८३ कोटी, ७१७ कोटी, ५०१.४० कोटी, ३९६.६० कोटी आणि १,२०० कोटी रुपये असे एकूण ३,०९८ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर २०२६-२७ च्या दुसऱ्या अर्थात पावसाळी अधिवेशनात सिंहस्थाच्या आवश्यक कामांसाठी ३,००० कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली.

या मंजूर पुरवणी तरतुदीतील शिल्लक १,८०० कोटी रुपये वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली होती. त्यानुसार आता नगरविकास विभागाने हा निधी वितरीत करण्यास औपचारिक मंजुरी दिली आहे.

हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंजूर उद्दिष्टाखालील आवश्यक कामांवरच खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सिंहस्थाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने शासनाकडून निधी उपलब्ध होत असल्याने आगामी काळात विविध पायाभूत सुविधा आणि कुंभमेळ्याशी संबंधित आवश्यक कामांच्या अंमलबजावणीला वेग येण्याची अपेक्षा आहे.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Municipal Corporation | गणेशोत्सवापूर्वी नाशिक खड्डेमुक्त होणार? मनपाचा 18,423 खड्डे बुजवल्याचा दावा

प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीनंतरच खर्च

संबंधित कामांना सक्षम प्राधिकारांची प्रशासकीय तसेच तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच निधी संबंधित यंत्रणांना वितरीत अथवा खर्च करता येणार आहे. निधी खर्च झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला तातडीने सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

या निधीच्या वापराची संपूर्ण जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त, नाशिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. निधी प्राधिकरणाच्या स्वीय प्रपंजी लेखा खात्यात जमा करून आवश्यकतेनुसार संबंधित बँक खात्यातून खर्च करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news