Drought Relief | जिल्हा वार्षिक योजनेतील 10 टक्के पुनर्विनियोजन अट रद्द

Drought Relief | पाणीटंचाई व जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी शासनचा मोठा निर्णय
water
water
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील 'अल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई व टंचाई निवारणाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी 'जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७' अंतर्गत पुनर्विनियोजनावर असलेली कमाल १० टक्क्यांची मर्यादा शिथिल केली आहे.

water
Nashik Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात 'अमृत स्नान' कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

या निर्णयामुळे जिल्हा प्रशासनाला टंचाई आणि जलसंधारणाच्या कामांसाठी थेट व पुरेशा निधी वळवणे शक्य होणार आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२६ च्या खरीप हंगामातील 'ट्रिगर १' लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये शासनाने यापूर्वीच दुष्काळ जाहीर केला आहे.

या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, आता निधीच्या विनियोगाचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत.

water
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यातून घडणार 'नवे नाशिक'; पुढील 40 वर्षांचा आराखडा तयार!

शासन निर्णयानुसार, निधीचे नियोजन व पुनर्विनियोजन करताना प्रामुख्याने जलसंधारण व पायाभूत सुविधा (नियोजन विभाग) आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांतील थेट पेयजल टंचाई उपाययोजना या दोन घटकातील कामांना प्राधान्य देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
निधीच्या विनियोगासाठी शासनाने काही महत्त्वपूर्ण अटी घालून दिल्या आहेत.

यात प्रामुख्याने ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कार्यदेश (वर्कऑर्डर) दिलेले नाहीत, अशा कामांचा जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव आढावा घेतील. दुष्काळग्रस्त भागातील पेयजल कामांसाठी नियमित राज्य योजनेतून आधीच निधी उपलब्ध असल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून दुबार खर्च करता येणार नाही.

water
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चौकशीत 690 नोंदींमध्ये फेरफार उघड

या कामांना राहणार प्राधान्य:

  • जलसंधारण व पायाभूत सुविधा (नियोजन विभाग): जलसंधारण, नाला खोलीकरण आणि मृदसंधारणाची कामे, जलयुक्त शिवार अभियान व शिवकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती, बंधाऱ्यांचे बळकटीकरण, के.टी. वेअर बंधाऱ्यांना फळ्या बसवणे व रिचार्ज शाफ्ट उभारणे, शासकीय रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा, अंगणवाड्या आणि आयटीआयमधील दुरुस्ती व देखभाल (नवीन बांधकामे वगळून), वैरूण विकास योजना, कृषी संलग्न कामे, सौर ऊर्जेवर आधारित ग्राम विद्युतीकरण आणि स्मशानभूमी दुरुस्ती.

  • दुष्काळग्रस्त तालुक्यांतील थेट पेयजल टंचाई उपाययोजना: विहिरींचे खोलीकरण आणि यातील गाळ काढणे, खासगी विहिरींचे थेट अधिग्रहण करणे, विध्न विहिरी (बोरवेल) खोदणे व त्यांची विशेष दुरुस्ती करणे, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती आणि तात्पुरत्या पूरक योजना राबवणे, धरणामध्ये चर खणणे (बुडक्या घेणे) आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news