Maharashtra Cricket Sang : सत्यजित बच्छाव, रामकृष्ण घोष महाराष्ट्र संघात

विजय हजारे ट्रॉफीसाठी निवड
नाशिक
नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व जलदगती गोलंदाज रामकृष्ण घोषची यंदा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व जलदगती गोलंदाज रामकृष्ण घोषची यंदा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटची ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा आहे. त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारीदरम्यान जयपूरला महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होणार आहेत.

सत्यजित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मार्च २०१७ पासून सत्यजित महाराष्ट्र संघातर्फे खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधीच्या ४८ सामन्यांत सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे ८१ बळी घेतले आहेत. रणजी स्पर्धेबरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात सत्यजितने २०१२ पासूनच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भेदक गोलंदाजीबरोबर आक्रमक फलंदाजी केलेली आहे.

नाशिक
Nashik Turf Cricket Tournament : नाशिक पोलिस महाकुंभ टर्फ क्रिकेट स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ

रामकृष्ण देखील गेल्या दोन हंगामापासून महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. रणजी स्पर्धेबरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात २०२२ पासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जलदगती गोलंदाज व फलंदाज अशी ओळख असलेला रामकृष्ण घोष मागील हंगामापासून विविध स्पर्धांत आपल्या अष्टपैलू खेळाची चमक दाखवत आहे. मागील वर्षापासून आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्सतर्फे निवड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news