Maharashtra Chamber of Commerce Election | उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच महाराष्ट्र चेंबर निवडणुकीचा निकाल ठरेल वैध

Maharashtra Chamber of Commerce Election | 'प्रगती' पॅनलप्रमुखांचा दावा : आजच्या मतमोजणी अन् निकालाकडे लक्ष
Maharashtra Chamber election complaint
Maharashtra Chamber election complaint
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

व्यापारी, उद्योजकांची अग्रणी संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, सोमवारी (दि. १५) मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, विरोधी 'प्रगती' पॅनलकडून उच्च न्यायालयात आठ याचिका दाखल झालेल्या असून, सोमवारीच यावर सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या निकालानंतरच महाराष्ट्र चेंबर निवडणुकीचा निकाल वैध ठरेल, असा दावा प्रगती पॅनलचे प्रमुख कांतिलाल चोपडा यांनी केला आहे.

Maharashtra Chamber election complaint
Maharashtra Chamber election complaint : ४० उमेदवारांची समितीकडे तक्रार

नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या या निवडणुकीत अर्ज छाननीत विरोधी प्रगती पॅनलच्या अनेक उमेदवारांचे अर्ज बाद केल्यामुळे मोजक्याच उमेदवारांसह 'प्रगती'ला निवडणूक रिंगणात उतरावे लागले. एकीकडे निवडणुकीला सामोरे जाताना, दुसरीकडे अर्ज छाननी समिती आणि तक्रार निवारण समितीच्या निर्णयाविरोधात प्रगती पॅनलने उच्च न्यायालयात धाव घेत तब्बल आठ याचिका दाखल केल्या.

या याचिकांवर गेल्या २९ मे, ९ व ११ जून रोजी सुनावणी झाली. पुढील सुनावणी सोमवारी (दि. १५) होणार आहे. दरम्यान, याच वेळी महाराष्ट्र चेंबरमध्ये मतमोजणी अन् निकाल जाहीर केला जाणार असल्यामुळे निकालावर उच्च न्यायालयाच्या सुनावणीचे सावट असणार आहे.

Maharashtra Chamber election complaint
Maharashtra Chamber of Commerce Election | महाराष्ट्र चेंबरसाठी दुसऱ्या दिवशी 411 मतदान

उच्च न्यायालयाने दि. २९ मे रोजी झालेल्य सुनावणीनंतर पारित ऑर्डरमध्ये 'निवडणूक आणि निकाल न्यायालयाच्या आधीन राहणार' अन नमूद केले होते. त्यामुळे सोमवारच्य सुनावणीकडे लक्ष लागून आहे. यांच्या निकालाकडे लक्ष वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी 'एकत पॅनलकडून करुणाकर शेट्टी व 'प्रगती'कडून संगीता पाटील मैदानात असून, मतदारांचा कौत नेमका कोणाच्या बाजूने याकडे लक्ष आहे याशिवाय नाशिक विभाग उपाध्यक्षपदासाठ 'एकता'कडून सुनीता फाल्गुने, 'प्रगती'कडून रतन पडवळ यांच्यात लढत होत आहे. जळगाव आणि कोकण उपाध्यक्षपदासाठीचा कौल कोणत्य पॅनलला मिळणार, याकडेही लक्ष लागून आहे.

लोकशाही मूल्य व महाराष्ट्र चेंबर सभासदांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आम्ही निवडणूक लढलो. निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांनी बेकायदेशीरपणे ९३२ नवीन सभासद नोंदणी केली. मनमानी पद्धतीने आमच्या उमेदवारांचे अर्ज बाद करून ९० टक्के जागा बिनविरोध करून घेतल्या. एकूण तीन हजार मतदानापैकी नवीन ९३२ सभासद आणि बोगस मतदान विचारात घेतल्यास आमची खरी लढाई १,४०० मतदानांमध्येच आहे. त्यामुळे निकाल काहीही आला, तरी आम्ही सभासदांमध्ये जागरूकता करण्यात यश मिळवल्याने आमचा खरा विजय झाला आहे.

- कांतिलाल चोपडा, प्रमुख, प्रगती पॅनल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news