Mahaparinirvan Din Special Trains Nashik Road | महापरिनिर्वाण दिनासाठी ४,५ ला विशेष रेल्वेगाड्या, सर्व गाड्यांना नाशिकरोड येथे थांबा

Mahaparinirvan Din Special Trains Nashik Road-महापरिनिर्वाण दिनासाठी ४,५ ला विशेष रेल्वेगाड्या, सर्व गाड्यांना नाशिकरोड येथे थांबा
Indian Railways |
Indian Railwaysfile photo
Published on: 
Updated on: 

देवळाली कॅम्प : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या नागपूर-मुंबई, मुंबई-नागपूर आणि अमरावती-मुंबई या मार्गावर धावणार असून, गाड्यांना नाशिकरोड येथे थांबा आहे.

Indian Railways |
Nashik Post-Diwali Water Tanker Crisis|201 गावे - वस्त्यांची तहान 60 टँकरवर

सर्व नागपूरहून मुंबईकडे ४ आणि ५ डिसेंबर रोजी चार विशेष गाड्या सुटतील. यामध्ये ४ डिसेंबरला सायंकाळी ६.१० वाजता आणि रात्री ११.५५ वाजता, तर ५ डिसेंबरला सकाळी ७.४० वाजता आणि सायंकाळी ६.१० वाजता या गाड्या सुटणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी मुंबईहून नागपूरकडे ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी पाच विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Indian Railways |
Nashik UBT Opposes Non-Tender Drainage Approval|मलवाहिका विनानिविदा मंजुरीला 'उबाठा'चा विरोध

तसेच अमरावतीहून ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबईकडे आणि मुंबईहून ७ डिसेंबर रोजी रात्री १२.४० वाजता अमरावतीकडे एक विशेष गाडी धावणार आहे. या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून, त्यांना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा एनटीईएस अॅपला भेट द्यावी. वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.