Nashik Municipal Corporation | स्थायी सभापतिपदी मच्छिंद्र सानप बिनविरोध

Nashik Municipal Corporation | भाजपने आर्थिक सत्ता राखली; मुकेश शहाणेंची माघार, उबाठा तटस्थ
goa news
goa news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहुमताच्या जोरावर नाशिक महापालिकेची सत्ता सलग दुसऱ्यांदा काबीज करत इतिहास घडविणाऱ्या भाजपने स्थायी समितीच्या रूपाने महापालिकेची आर्थिक सत्ताही राखली आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी बुधवारी झालेल्या निवडणु‌कीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार (अपक्ष) मुकेश शहाणे यांनी माघार घेतल्याने भाजपचे मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाली.

goa news
Farmers Protest Nashik | लासलगावात कांद्याचा 'वांदा'! दर 500 रुपयांवर आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

भाजपकडील स्पष्ट बहुमत आणि शिवसेना शिंदे गटाने युतीधर्म पाळत भाजपला आधीच जाहीर केलेला पाठिंबा यामुळे सानप यांची निवड निश्चित होती, त्यातच राष्ट्रवादीने माघार घेतल्याने बिनविरोध निवड सुकर बनली. प्राबल्य नसलेली शिवसेना (उबाठा) ही या निवडणुकीत तटस्थ राहिल्याने भाजपला अप्रत्यक्ष मदतच झाली, महापौर-उपमहापौर निवडीनंतर स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बहुमताच्या जोरावर १६ सदस्यीय समितीत भाजपचे नऊ सदस्य असल्याने सभापती भाजपचाच होणार हे स्पष्ट होते. त्यातच चारसदस्यीय शिवसेनेनेदेखील भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने ही निवडणूक एकांगी बनली होती.

युतीच्या सतेतील घटक पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अपक्ष मुकेश शहाणे यांच्या रूपाने आव्हान दिल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. विरोधी पक्ष असलेल्या उबाठाने मात्र या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली होती. अखेर बहुमतासमोर राष्ट्रवादीला माघार घेणे भाग पडले. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील स्थायी समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.

नगरसचिवांनी सभा कामकाज निषमावलीचे वाचन केल्यानंतर पीठासन अधिकायांनी सभेला सुरुवात केली. वा निवडणुकीसाठी सत्तारूढ गटातूनच सानप व सहाणे यांचे दोन उमेदवारी अर्ज असल्याने पीठासन अधिकाऱ्यांनी माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत दिली. या मुदतीत पक्षादेशानुसार शहाणे यांनी माघार घेतली.

goa news
Nashik Cyber Crime | एक रुपयाच्या बहाण्याने लाखोंचा डल्ला

त्यामुळे सानप यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड पोठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी घोषित केली, यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके, आ. देवयानी फरदि, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना उपनेते अजय वोरस्ते, भाजप नेते नीलेश बोरा, शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते अॅड. श्याम बडोदे, बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी, आदींनी नवनिर्वाचित सभापती मच्छिंद्र सानप यांना शुभेच्छा दिल्या

बंद दरवाजाआड निवडणूक, माध्यमांना रोखले

स्थायी समिती कायम अर्थकारणांमुळे चर्चेत असते. बंद दरवाजाआड होणारे निर्णय स्थायी समितीसाठी नवीन नाहीत. किंबहुना याच कारणांमुळे या समितीच्या कारभारावर टीका होत असते. या समितीच्या सभापतिपदाची बुधवारी (दि. २५) झालेली निवडणूकही बंद दरवाजाआड पार पडल्याने वादग्रस्त ठरली.

निवडणूक सभेच्या वृत्तांकनापासून प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवले गेले. सुरक्षारक्षकांकरवी माध्यमांना रोखले गेले. त्यामुळे माध्यमांनी बहिष्काराख उगारले, अखेर पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष शर्मा, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच नवनिर्वाचित सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिलगिरी व्यक्त करत माध्यम प्रतिनिधींची नाराजी दूर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news