Nashik Cyber Crime | एक रुपयाच्या बहाण्याने लाखोंचा डल्ला

Nashik Cyber Crime | कथित सैन्य अधिकाऱ्याचा अनेक उद्योजकांना गंडा
Cyber Crime News
डिजिटल अरेस्टची भीती घालून सव्वा कोटीचा गंडा(File Photo)
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

एका कथित सैन्य अधिकाऱ्याने शहरातील १० ते १५ उद्योजकांना लाखो रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या प्रकरणी अद्याप एकही उद्योजक तक्रारीसाठी पुढे आला नसल्याने, हा भामटा सध्या मोकाट आहे.

Cyber Crime News
Nashik Regional Innovation Centre | नाशिककरिता प्रादेशिक नावीन्यता केंद्राचा प्रस्ताव

या भामट्याविषयी उद्योग वर्तुळात प्रचंड धास्ती अन् चर्चा रंगत आहे. 'एक रुपयाच्या बहाण्याने लाखो रुपयांवर डल्ला' मारण्याची त्याची मोडस ऑपरेंडी आहे. शहरातील प्रतिष्ठित उद्योजक संघटनेच्या त्याच्यावरील आपबिती सांगताना या भामट्यापासून पदाधिकाऱ्याने उद्योजकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

हा भामटा चलाखीने उद्योगांच्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांच्या प्रॉडक्टची माहिती गोळा करतो. त्यानंतर संबंधित उद्योजकांचा मोबाइल मिळवत व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून उद्योजकाशी संपर्क साधतो.

'मला कंपनीचे प्रॉडक्ट हवे आहेत, अशी विश्वासार्ह भाषा वापरत तो एक ते दीड लाखाचे बुकिंग देतो. प्रॉडक्ट पसंत पडले तर मोठी ऑर्डर देणार, अशी गोड बतावणी करत उद्योजकांचा विश्वास मिळवतो. तो सैन्याच्या लेटरहेडवर बनावट खरेदी ऑर्डर पाठवतो. डिलिव्हरीसाठी आर्टिलरी सेंटरचा पत्ता देतो. त्यामुळे व्यवहार अधिकृत असल्याचा भास होतो.

गेटवर पोहोचल्यावर डिलिव्हरी बॉयने त्यास संपर्क साधल्यास, तो कंपनी मालकाशी पुन्हा एकदा संपर्क साधतो अन् इथेच त्याची खेळी सुरू होते. तो कंपनी मालकाला माझ्याकडे बँक डिटेल्स नसल्याने तुम्ही मला या क्रमांकावर एक रुपया पाठवा, मी लगेच पूर्ण पेमेंट ट्रान्सफर करतो, असा निरागस भासवणारा सल्ला देतो.

उद्योजकाने एक रुपया पाठवताच काही क्षणातच त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम साफ होते. आतापर्यंत नाशिकमधील १० ते १५ उद्योजक त्याच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीने किंवा व्यवहारातील निष्काळजीपणामुळे अद्याप कोणीही अधिकृत तक्रार दिलेली नाही. त्यामुळे हा भामटा अजूनही मोकाट आहे.

इमोशनल ब्लॅकमेलिंग

या भामट्याकडून इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याचादेखील प्रयत्न केला जातो. हा भामटा स्वतःला इंडियन आर्मीचा पदाधिकारी असल्याचे सांगतो.. नाशिक येथे कार्यरत असल्याची बतावणी देतो. सैन्याधिकाऱ्याच्या वेशातील फोटो त्याने व्हॉट्स अॅप डीपी म्हणून ठेवला आहे. तिरंग्याच्या इमोजी शेअर करत 'जयहिंद' यासारखे तो शब्द वापरतो. या शब्दांमुळे देशप्रेम जागे होऊन जाळ्यात ओढणे शक्य होत असल्याची त्याची मोडस ऑपरेंडी आहे.

Cyber Crime News
Viresh Borkar Hunger Strike | गोव्यात 'टीसीपी' फाईल्स गायब! आंदोलनानंतर 10 फाईल्स चोरीला गेल्याचा खळबळजनक दावा

उद्योग वर्तुळात मोठी दहशत

या भामट्याची सध्या उद्योग वर्तुळात मोठी दहशत दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर या भामट्याला शेअर केला आहे. याच्यापासून 'सावध राहा, एक रुपया पाठवू नका', असे आवाहन केले जात आहे. मात्र, उद्योजकांनी या भामट्याविरोधात एकत्र येत तक्रारीस पुढे येण्याची गरज आहे.

उद्योजकांनी पूर्णपणे खातरजमा केल्याशिवाय कोणासोबतही ऑनलाइन व्यवहार करू नये. आतापर्यंत ज्या उद्योजकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधायला हवा. जेणेकरून अन्य उद्योजकांची फसवणूक होणार नाही. तक्रार प्राप्त होताच पोलिस कारवाई करतील.

- संजय पिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news