Nashik Coaching Classes | कोचिंग क्लासचालकांना महापालिका बजावणार नोटिसा

Nashik Coaching Classes | उत्तर प्रदेशातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभाग सतर्क
Coaching Center Fire
Coaching Center Fire : लखनऊमधील पुरनिया चौकाजवळील एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागली. Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे कोचिंग क्लास असलेल्या इमारतीला आग लागून १५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर महापालिकेचा अग्रिशमन विभाग खडबडून जागा झाला आहे. शहर परिसरातील सर्व खासगी कोचिंग क्लासेसचे सर्वेक्षण केले जाणार असून, संबंधित क्लासचालकांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत किंवा नाहीत, याची खात्री केली जाणार आहे.

Coaching Center Fire
Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष; २५ हजारांहून अधिक इमारतींपैकी फक्त ४८९ संस्थांनीच अहवाल सादर केला

अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना न क्लासचालकांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती मुख्य असिशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली आहे. आढळल्यास उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंज पुरानिया परिसरातील कोचिंग क्लासच्या तीन मजली इमारतीला भीषण आग लागून १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२२) घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असून, खासगी कोचिंग क्लासेसमधील अग्रिप्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नाशिक शहर परिसरात सुमारे दोन हजारांवर क्लासेस आहेत. यात घरगुती क्लासेसची संख्या अधिक असली तरी अलीकडच्या काळात कॉर्पोरेट क्लासेसची संख्यादेखील वाढली आहे. अशा खासगी क्लासेसमध्ये शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्ताने चर्चेत आला आहे.

काही वर्षांपूर्वी गुजरात राज्यातील एका क्लासमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने शहर परिसातील चारशेवर खासगी क्लासेसचालकांना नोटिसा बजावत फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काही क्लासचालकांनी अझिप्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणल्या. परंतु, बहुसंख्य क्लासचालकांनी या नोटिसांना फारसे महत्त्व दिले नाही.

महापालिकेच्या अनिशमन विभागानेदेखील पुन्हा या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. आता उत्तर प्रदेशातील घटनेने या महत्त्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. यासंदर्भात महापालिकेचे मुख्य असिशमन अधिकारी संजय बैरागी यांना विचारणा केली असता शहरातील सर्व क्लासचालकांचे सर्वेक्षण करून अमिप्रतिबंधक उपाययोजनाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले. अभिप्रतिबंधात्मक उपाययोजना न बसविणाऱ्या क्लासचालकांना नोटिसा बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Coaching Center Fire
Pimpri Fire Safety Coaching Classes: पिंपरी-चिंचवडमधील कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न; अग्निशमन विभागाचा इशारा

क्लासचालकांचा हलगर्जीपणा, महापालिकेचीही धरसोडवृत्ती

गुजरातमधील दुर्घटनेनंतर महापालिकेने खासगी कोचिंग क्लासचालकांना नोटिसा बजावण्याचे केवळ सोपस्कार पार पाडले. एखाद्या चार मजली इमारतीत क्लास तिसऱ्या मजल्यावर असेल तर त्या क्लासचेच फायर ऑडिट केले जाणे अपेक्षित असताना महापालिकेने संपूर्ण इमारतीच्या फायर ऑडिटची जबाबदारी क्लासचालकांवर सोपवत नोटिसा बजावल्या होत्या. इमारतीत अन्यही अनेक सभासद असताना क्लासचालकांना संपूर्ण इमारतीचे फायर ऑडिट न परवडणारे होते. त्यामुळे क्लासचालकांनीही या नोटिसीला केराची टोपली दाखविली. आता मात्र क्लासच्या जागेपुरतेच फायर ऑडिट करण्याची नोटीस बजावली जाणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी बैरागी यांनी सांगितले.

शहरातील सर्व वाणिज्य वापराच्या इमारती तसेच मोठ्या गृहनिर्माण ८८ संस्थांनी वर्षातून दोन वेळा फायर ऑडिटचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. शहरातील सर्व खासगी कोचिंग क्लासेसचे सर्वेक्षण करून अझिप्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली किंवा नाही याची खात्री केली जाणार आहे.

संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news