Leopard terror in Nashik Yeola : नेऊरगाव - एरंडगाव परिसरात बिबट्याची दहशत

मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांची होतेय कसरत
येवला (नाशिक)
येवला : पिंपळगाव लेप येथे वनविभागातर्फे लावण्यात आलेला पिंजरा.(छाया : संतोष घोडेराव)
Published on
Updated on

येवला (नाशिक) : तालुक्यातील नेऊरगाव -एरंडगाव परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एरंडगाव - नेऊरगाव रस्त्यावर चिंधीआई परिसरात बिबट्या असल्याची चर्चा सुरू असल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे त्या मार्गावरील काही पालक आपल्या मुलांना स्वतः वाहनाने शाळेत पोहोच करत आहे. येवला तालुक्यात वनविभागाने एकूण १० ठिकाणी पिंजरे लावले आहे.

परिसरातील शेतशिवारात तसेच वस्तीच्या आसपास बिबट्या दिसल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असला तरी बिबट्या पिंजऱ्यालाच हुलकावणी देत असल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. बिबट्याच्या दहशतीचा सर्वाधिक परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहे.

येवला (नाशिक)
Girishbhau Mahajan : गिरीश भाऊ… असे नका बिबट्यामागे धावू…!

सकाळी व दुपारी शाळेत ये - जा करताना भीती वाटत असल्याने अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे टाळले आहे. परिणामी शाळांमधील विद्यार्थी संख्या लक्षणीयरित्या रोडावली आहे. काही पालक स्वतः मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा जात आहेत. कामधंदा सोडून पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी धावपळ करावी लागत असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनाही रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. पाळीव जनावरांवर हल्ल्याची भीती असून ग्रामस्थांनी रात्री बाहेर पडणे टाळले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे गस्त वाढवण्याची, अधिक पिंजरे लावण्याची तसेच तातडीने बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तालुक्याच्या उत्तरपूर्व व पश्चिम पट्ट्यात वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. ममदापूर, राजापूर, देवदरी, खरवंडी, रहाडी, रेंडाळे परिसरात वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. त्यात हरीण, काळवीट, मोर, तरस, कोल्हे, लांडगे यासह इतरही वन्य प्राणी आहेत. वनविभाग केवळ बिबट्यांवर नव्हे तर सर्वच वन्य प्राण्यांवर उपचार करत आहे. विहिरीत पडलेल्या हरीण, काळवीट, कोल्हा, सायाळ, उदमांजर यांच्यासाठीही आधुनिक बचाव पथक तत्पर आहे.

येवला (नाशिक)
Leopard Attack in Nashik : नाशिकला भरवस्तीत बिबट्याचा धुमाकुळ; सात जणांवर हल्ला

येवला तालुका पिंजरा - १०

  • पारेगाव - २

  • सत्यगाव - १

  • साताळी - १

  • पिंपळगाव लेप - १

  • एरंडगाव - १

  • आडगाव चौथा - १

  • भुलेगाव - १

  • पिंपळखुटे तिसरे - १

  • कानडी - १

बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभाला माहिती द्यावी. रात्री बाहेर पडताना काळजी घ्यावी. पाळीव जनावरांना गोठ्यात बांधावे. वनविभागाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

राहुल घुगे, वनाधिकारी, येवला

तालुक्यात पकडलेले बिबटे

  • बदापूर -१

  • भिंगारे - १

  • सातळी - १

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news