Leopard Attack | दोन दिवसांत दुसरा हल्ला, ओझे परिसरात बिबट्याची दहशत; जखमी मेंढपाळ जिल्हा रुग्णालयात दाखल

Leopard Attack | तालुक्यातील ओझे येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी ७ च्या सुमारास हरीश निगळ यांच्या वालवडीच्या शेतात मेंढपाळ अजय गोयकर हे मेंढ्यांना वालवड तोडण्यास गेले असता, त्यांच्यावर मागून हल्ला करून बिबट्याने जखमी केले.
leopard news
Leopard Terror : गंगापूर तालुक्यात बिबट्यांची दहशतpudhari
Published on
Updated on

दिंडोरीः पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील ओझे येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी ७ च्या सुमारास हरीश निगळ यांच्या वालवडीच्या शेतात मेंढपाळ अजय गोयकर हे मेंढ्यांना वालवड तोडण्यास गेले असता, त्यांच्यावर मागून हल्ला करून बिबट्याने जखमी केले. जखमी अजय यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

leopard news
Nashik Outer Ring Road | शेतकऱ्यांच्या सहमतीनेच बाह्य रिंग रोडचा तोडगा

ओझे परिसरात दोन दिवसांत बिबट्याने दुसरा हल्ला केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मेंढपाळ अजय गोयकर व तुळशीराम सूळ हे दोघे मेंढ्यांना चारा आण्यासाठी ओझे येथील निगळ यांच्या शेतात गट क्रमांक १०५ मध्ये वालवडीचा चारा घेण्यासाठी गेले होते.

त्यावेळी काही वेळातच बिबट्याने गोयकर यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यावेळी त्यांनी जोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात गोयकर हे जखमी झाले. त्यांना दिंडोरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे काही लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नाशिक येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

leopard news
Nashik Water Scarcity | जिल्ह्यात 347 गावांना 118 टँकरने पाणीपुरवठा

ओझे परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी. वनविभागाने या परिसरात बिबट्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत गावागावात जाऊन प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे काही प्रमाणात बिबट्यांचे होणारे हल्ले रोखता येतील किंवा नागरिकांना बिबट्यांपासून बचाव करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news