Lasalgaon Gas Cylinder | लासलगावमध्ये तब्बल 22 दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर वितरणाला सुरुवात

Lasalgaon Gas Cylinder | ढोल-ताशे आंदोलनाची दखल; हजार बुकिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Cylinder
Cylinder
Published on: 
Updated on: 

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
हिंदुस्तान पेट्रोलियमच्या जाधव गॅस एजन्सीविरोधात लासलगाव शहर विकास समितीने केलेल्या ढोल-ताशे बजाव आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतल्यानंतर शहरातील घरगुती गॅस सिलिंडर वितरण्या वेग आला आहे. तब्बल २२ दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (दि. २६) सायंकाळी २५० सिलिंडरचे वितरण झाले.

Cylinder
Lasalgaon Onion Price | लासलगाव बाजारात कांदा दराला फटका! सरासरी भावात 450 रुपयांची मोठी घसरण

मंगळवारी आणखी ५०० सिलिंडर वितरित करून बुधवार (दि. २८) पर्यंत शहरातील एक हजार प्रलंबित बुकिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती जाधव गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सागर बनबेरू यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन बुकिंग करून तसेच पैसे भरूनही गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात होत्या.

सणासुदीच्या काळातच सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने लासलगाव शहर व परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अनेक ग्राहकांना २० दिवसांहून अधिक काळ सिलिंडरची वाट पाहावी लागत होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २४) लासलगाव शहर विकास समितीने ढोल - ताशे बजाव आंदोलन करून निषेध केला होता.

Cylinder
Lasalgaon Market | लासलगाव बाजार समितीत खुर्चीचे राजकारण; छगन भुजबळांनी दोन्ही गटांना सुनावले खडे बोल!

ग्रामीण भागासाठी स्वतंत्र व्यवस्था लासलगाव शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सी. डी. पटणी गॅस एजन्सी (येवला) आणि कातकडे गॅस एजन्सी (मनमाड) यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत गॅस सिलिंडर वितरणाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रलंबित बुकिंग पूर्ण करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन

गॅस वितरणाला वेग मिळत असला, तरी सर्व ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचवण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, घाईगडबड टाळावी आणि प्रलंबित बुकिंगनुसार घरपोच सिलिंडर वितरणासाठी एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन लासलगाव शहर विकास समितीने केले आहे.

"नोंदणीकृत ग्राहकांना घरपोच सिलिंडर वितरणाचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होऊन पुरवठा पूर्ववत होईल. त्यामुळे नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे."

— विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news