Lasalgaon Onion Market Price | उच्चांकी भावाने बळीराज्याला मोठा दिलासा; डिसेंबरपासून आवक वाढण्याची शक्यता

Lasalgaon Onion Market Price | मागणीत वाढ, पुरवठा घटला; आवक अत्यल्प असल्याने बाजारभावात तेजी कायम
Onion
OnionPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांद्याच्या बाजारभावातील तेजी कायम असून, सोमवारी (दि. १६) झालेल्या लिलावात लाल कांद्याला कमाल ५ हजार ५०० रुपये प्रतिरविंटलचा दर मिळाला. मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याचा पुरवठा कमी असल्याने दरात तेजी टिकून आहे.

Onion
Lasalgaon Onion Price | लासलगाव बाजारात कांदा दराला फटका! सरासरी भावात 450 रुपयांची मोठी घसरण

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लाल कांद्याची आवक मंदवली असून, सध्या बाजारात अत्यल्प प्रमाणात नवीन लाल कांदा दाखल होत आहे. डिसेंबर महिन्यापासून लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता बाजार समिती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सोमवारी लासलगाव बाजार समितीत एकूण ३५८ वाहनांतून ४ हजार ४६८ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये १७० वाहनांतून २ हजार १४२ क्विंटल नवीन लाल कांदा, तर १८८ वाहनांतून २ हजार ३२६ क्विंटल उन्हाळ कांदा दाखल झाला. लाल कांद्याला कमाल ५ हजार ५००, किमान १ हजार आणि सरासरी ४ हजार ५०० रुपये प्रतिरविंटल दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याला कमाल ४ हजार ३७६, किमान २ हजार २९१ आणि सरासरी ४ हजार रुपये प्रतिरविंटल भाव मिळाला.

यावेळी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लाल कांद्याच्या पिकावर परिणाम झाला असून, सध्या बाजारात अपेक्षित आवक होत नाही. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने कांद्याचे दर टिकून आहेत. डिसेंबर महिन्यापासून नवीन लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर बाजारभावाची दिशा स्पष्ट होणार आहे.

चांगल्या बाजारभावांसाठी शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला नेहमीच पसंती असते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह शेजारील छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतकरीही कांदा विक्रीसाठी लासलगावाला आणत आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याची योग्य प्रतवारी करून बाजारात आणल्यास चांगला दर मिळण्यास मदत होईल.

— डी. के. जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

Onion
Lasalgaon Market | लासलगाव बाजार समितीत खुर्चीचे राजकारण; छगन भुजबळांनी दोन्ही गटांना सुनावले खडे बोल!

लाल कांदा बाजारभाव

  • किमान: १,०००

  • कमाल: ५,५००

  • सरासरी: ४,५००

  • ट्रेक्टर: ५१

  • पिकअप: ११९

उन्हाळ कांदा बाजारभाव

  • किमान: २,२९१

  • कमाल: ४,३७६

  • सरासरी: ४,०००

  • ट्रेक्टर: ३५

  • पिकअप: १५३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.