Lasalgaon To Ladakh Solo Bike Ride | जिद्द, धैर्य अन् बुलेटवर लडाख

Lasalgaon To Ladakh Solo Bike Ride | लासलगावच्या हेमंत भावसार यांनी सर केला १९ हजार फूट उंचीवरील हिमांक
Bike
BikePudhari
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादे स्वप्न असते. काहीजण ते पाहतात, तर काही जण ते जिद्द, धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर प्रत्यक्षात उतरवतात. लासलगावच्या हेमंत रवींद्र भावसार यांनीही असेच स्वप्न पूर्ण केले. आपल्या बुलेटवरून स्वखर्चाने तब्बल ६,५०० किलोमीटरचा लासलगाव ते लडाख हा खडतर 'सोलो' प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करत त्यांनी अनेक तरुणांसमोर प्रेरणेचा आदर्श ठेवला आहे.

Bike
Satara Tree Plantation: वृक्षारोपणासाठी महिलांनी आणले डोक्यावरून पाणी

दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे विश्वस्त तथा भावसार ऑप्टिशियन्सचे संचालक असलेले हेमंत भावसार यांना दुचाकीवरून दुर्गम भागात भटकंती करण्याची लहानपणापासूनच आवड आहे. अनेक वर्षे मनात जपलेले लडाखचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले.

या मोहिमेदरम्यान त्यांनी समुद्रसपाटीपासून सुमारे १९,०२४ फूट उंचीवरील हिमांक (उमलिंग-ला) परिसरातील कठीण मार्ग गाठला. विरळ हवा, गोठवणारी थंडी, पावसाच्या सरी, बर्फाच्छादित रस्ते आणि अवघड वळणांचा सामना करत त्यांनी हा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला. प्रत्येक किलोमीटर त्यांच्या धैर्याची, संयमाची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेत होता.

Bike
Tree Cutting Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवली मनपातील विकासासाठी वृक्षतोडीचे प्रश्न ऐरणीवर

लासलगावच्या रस्त्यांपासून हिमालयाच्या कुशीत पोहोचलेला हा प्रवास केवळ अंतराचा नव्हता, तर स्वप्नाच्या पूर्ततेचा होता. निफाड तालुक्यातून लडाखपर्यंत एकट्याने बुलेटवरून मोहीम यशस्वी करणारे ते पहिले धाडसी रायडर ठरल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी आमदार कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, संजय पाटील, लासलगावच्या सरपंच योगिता पाटील, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, वेदिका होळकर, सोनिया होळकर, गुणवंत होळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news