नाशिक : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील नऊ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून लाभ घेतलेली रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासन या कर्मचाऱ्यांना दोन- तीन दिवसांत नोटीस बजावणार असून यात, सात दिवसांच्या खुलासा करावा. सदर खुलासा समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेची घोषणा केली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील एक हजार 183 कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यात तब्बल 17 पुरुष कर्मचारी आहेत.
या 17 कर्मचाऱ्यांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेत दोन कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण नऊ कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतला असल्याचे छाननी प्रक्रियेनंतर निर्देशनास आले आहे. यात दोन पुरुष तर सात महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्राप्त यादीतून त्यांचे नावे महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली आहे. त्याआधारे या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस काढण्यात येणार आहे. यात लाभाची रक्कम तात्काळ शासनाकडे भरणा करावी, योग्य तो खुलासा सात दिवसांत सादर करण्यात यावा असे म्हटल्याचे बोलले जात आहे.
अलका रतन खर्डीकर
आशा रामदास वनीस
कल्याणी रामदास पाटील
काशीनाथ पिलाजी गोडसे
किशोर केशवराव ठाकूर
मंगला सीताराम ठाकरे
पूनम पकंज शिराळे
शैलानी भगवान गांगुर्डे
सुखदा अभय पाराशरे