.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत हेमंत धात्रक आणि तानाजी जायभावे यांच्या प्रगती पॅनलने २९ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळविला असला तरी महत्त्वाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन जागांवर परिवर्तन पॅनलचे कोंडाजी आव्हाड आणि उदय घुगे हे निवडून आल्याने सभासदांनी दिलेला सर्वसमावेशक कौल मान्य करत एकमेकांच्या हातात हात घेत संस्थेचा हा जगन्नाथाचा रथ पुढे नेणे आवश्यक ठरणार आहे. घटनेत जरी अधिकार काढून घेण्याबाबत उल्लेख असला तरी सभासदांनी दिलेल्या निर्णयाला मान देत अधिकार काढून घेण्याच्या प्रक्रियेत वेळ न दवडता संस्था कशी विकासाकडे नेता येईल त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल.
गेल्या निवडणुकीत पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिवीर पॅनलने आव्हाड यांच्या प्रगती पॅनलचा धुव्वा उडवला होता. त्यावेळी प्रगती पॅनलचे सरचिटणीसपदाचे हेमंत धात्रक आणि सहचिटणीस म्हणून तानाजी जायभावे हेच निवडले गेले होते. बाकी पूर्ण पॅनल हा थोरे यांचा निवडून आला होता. गेल्या पाच वर्षांत थोरे यांनी लावलेली प्रशासकीय आणि आर्थिक शिस्त सभासदांनी या निवडणुकीत नाकारली. या निवडणुकीत थोरे यांच्या क्रांतिवीर विकास पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तसेच नव्या सदस्यांना सोबत घेत निवडणूक लढविणाऱ्या मनोज बुरकुले यांच्या नव ऊर्जा पॅनलचाही धुव्वा उडाला.

निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर नव्या संचालक मंडळासमोर अनेक आव्हाने आ वासून समोर उभे आहेत. यात प्रामुख्याने दोन्ही पॅनलच्या विजयी उमेदवारांनी एकत्रित येत संस्थेला विकासाकडे नेणे. दुसरे म्हणजे आवश्यक असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कौशल्याधारित शिक्षणाला सुरुवात करणे. सध्यास्थितीत ७० पैकी अवघे पाचच कौशल्याधारित कोर्सेस सुरू झाले आहे. त्यामुळे त्याला महत्त्व देत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालय स्तरावरून लागणाऱ्या परवानग्या मिळविणे, कोर्सेसची संख्या वाढविणे, विद्यार्थिसंख्या वाढविणे. त्यानंतर निवडणुकीमध्ये मयत सभासदांच्या वारसांची नोंदणी हा महत्त्वाचा मुद्दा गाजला होता. सभासदांना दिलेल्या आश्वासन, वचननामा, शपथनामा यामध्ये दिलेले आश्वासने पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.
मतदानाच्या दिवशी झालेला गदारोळ बघता संस्थेने सभासदांची नव्याने नोंदणी करणे हे कितपत हितकारक असणार आहे? तसेच सभासदांनी कौल देताना माजी आमदार बाळासाहेब सानप, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत असलेले अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, गेल्या चार टर्मपासून पदाधिकारी असलेले पी. आर. गिते यांना लांबच ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे सभासदांनी दिलेला सर्वसमावेशक कौल मान्यच करणे हिताचे ठरणार आहे. एकूणच काय तर 'दुरितांचे तिमिर जावो' या उक्तीला साजेसे काम करण्याची संधी सभासदांनी दिली असल्याची जाणीव कायमस्वरूपी ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.