Trimbakeshwar Kumbh Mela 2027 | त्र्यंबकला सिंहस्थासाठी 780 कोटींची कामे सुरू

Trimbakeshwar Kumbh Mela 2027 | आयुक्त शेखर सिंहांकडून पाहणी, गुणवत्तेवर सर्वाधिक भर देण्याचे निर्देश
nashik news
nashik news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्धर शहर व परिसरात विविध विभागांमार्फत सुरू असलेली पायाभूत सुविधांची ७८०.७७ कोटीची विकासकामे सुरू आहेत. कामांना भेट देऊन पाहणी करीत गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

nashik news
Nashik Zilla Parishad | जि. प. आरक्षणविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्या

आयुक्त सिंह यांनी त्र्यंबकेश्वर येथे प्रयाग तीर्थ, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प, मुकुंद तलाव, जलशुद्धीकरण केंद्र बिल्वेश्वर तलाव, घनकचरा व्यवस्थापन आदी विविध विकासकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा मंजूताई वारुणसे, सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते. दर मंगळवारी आढावा यापुढे दर मंगळवारी नियोजित प्रकल्पांना भेटी देऊन कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

nashik news
Dadasaheb Phalke Memorial Nashik | दादासाहेब फाळके स्मारकात साकारणार 'वेस्ट टू वंडरपार्क'

वेळेत काम पूर्ण करण्याबरोबरच दर्जेदार हवीत : कुंभमेळा आयुक्त

पाहणीनंतर नगर परिषदेत बैठक झाली. आयुक्त सिंह म्हणाले की, कुंभमेळ्याचा मुख्य कालावधी दि. १५ जून ते ३० सप्टेंबर २०२७ आहे. केवळ कामे पूर्ण करणे हे उद्दिष्ट नसून, ती उत्च्च्च दर्जाची असणे अत्यावश्यक आहे. ही कामे भाविकांच्या सुरक्षितता, सुबिधा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

प्रयाग तीर्थ, इंद्रकुंड, मुकुंदेश्वर तीर्थ, बिल्वतीर्थ येथील साठलेला गाळ काढणे, स्वच्छता व संवर्धनाची कामे सुरू करावीत, कुशावर्त कुंड येथील पहिल्या टप्प्यातील काम ध्वजारोहणापूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे तसेच दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दर्शन पथ व डीपी रस्त्याच्या कामांना गती द्यावी, सांडपाणी प्रक्रिया केंद्राची कामे, घनकचरा प्रकल्पाच्या कंपाउंड भिंतीचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news