कुंभमेळा 2027 : नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार

सिंहस्थामध्ये नाशिकरोड रेल्वे स्टेशनसाठी आर्किटेक्ट महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेणार
नाशिकरोड रेल्वे स्टेशन
नाशिकरोड रेल्वे स्टेशनpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क - नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी शहरातील आर्किटेक्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्याचे रेल्वे विभागाने निर्णय घेतला आहे

सिंहस्थ कुंभमेळ्याच्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने स्टेशन व्यवस्थापक, व्यावसायिक, पार्सल कार्यालय, आरपीएफ, तिकीट तपासनीस कर्मचारी आदी कार्यालयांचा समावेश असणाऱ्या स्टेशनवरील इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2027 मध्ये कुंभमेळा तयारी नियोजनात स्टेशनसंदभार्तील कामे पुर्णत्वास नेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

आर्किटेक्ट महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेणार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच नाशिक दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागाची रचना करण्यासाठी स्थानिक आर्किटेक्ट महाविद्यालयांशी संपर्क साधण्याची सूचना केली. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविक उपस्थित राहणार आहेत. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आलेली होती. यावेळी त्याच अनुषंगाने पुढील नियोजनाची तयारी करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानक इमारतीच्या पुनर्विकास करण्याची आवश्यकता या दौऱ्या दरम्यान मांडली होती. नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागाची व इमारतीची रचना करताना स्थानिक संस्कृती व परंपरा यांचे प्रतिबिंब उमटणे महत्वाचे आहे. स्थानिक आर्किटेक्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे साध्य करता येणार असल्याने स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने लवकरच आर्किटेक्ट महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे नियोजन रेल्वे अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news