Ketan Shirsath Death Case | फारकत, पैशांची मागणी अन् मानसिक त्रासाचा आरोप; अखेर 32 वर्षीय केतन शिरसाठचा दुर्दैवी अंत

Ketan Shirsath Death Case | केतन रमेश शिरसाठ (रा. कळमथे) असे मृत पतीचे नाव आहे. त्यांचा भाऊ राहुल शिरसाठ यांनी कळवण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
Death
DeathPudhari
Published on: 
Updated on: 

कळवण : पुढारी वृत्तसेवा

पत्नीशी सुरू असलेला कौटुंबिक वाद, फारकतीसाठी १३ लाख रुपयांची 'कथित' मागणी आणि मानसिक त्रासाला कंटाळून कळवण तालुक्यातील ३२ वर्षीय पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केतन रमेश शिरसाठ (रा. कळमथे) असे मृत पतीचे नाव आहे. त्यांचा भाऊ राहुल शिरसाठ यांनी कळवण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

Death
Kalwan Crop Damage | कळवण तालुक्यात पिकांनी टाकल्या माना

तक्रारीनुसार, १३ लाख रुपये पाहिजेत. पैसे न दिल्यास सोडणार नाही, अशी मागणी पत्नी रूपाली हिने केल्याचा आरोप आहे. याशिवाय, फारकत न दिल्यास नोकरी करू देणार नाही, पैशांसाठी वारंवार दबाव आणला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

केतनचा विवाह ९ मे २०२५ रोजी रूपाली सूर्यवंशी देवपूरपाडे (ता. देवळा) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळातच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी नातेवाइकांच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. मात्र वाद कायम राहिल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

Death
Nashik Heavy Rain Alert | पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी तालुक्यांना झोडपले

७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या बैठकीत १३ लाखांच्या 'कथित' मागणीचा मुद्दा पुन्हा पुढे आला, असे तक्रारीत नमूद आहे. कुटुंबियांनी आर्थिक परिस्थिती नसल्याने ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र १३ लाख रुपये मिळाल्याशिवाय फारकत देणार नसल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

या सततच्या कौटुंबिक वादामुळे केतनची मानसिक स्थिती बिघडत होती, असा दावा भावाने केला आहे. अखेर १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास मोकभणगी शिवारातील वन विभागाच्या जागेत झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत केतनने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत केतनच्या कुटुंबियांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.