Kalwan MSRTC Depot | आगाराला अजून 10 'राजमाता जिजाऊ' बसेस मिळणार : राहुल बोरसे

Kalwan MSRTC Depot | आगाराला अजून 10 'राजमाता जिजाऊ' बसेस मिळणार : राहुल बोरसे
ST BUS NEWS
ST BUS NEWS : एसटीच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ बस दाखलfile photo
Published on
Updated on

कळवण : पुढारी वृत्तसेवा

येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल झाल्या आहेत. त्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांसह अधिकारी, कर्मचारी आणि चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ST BUS NEWS
Revenue Department Vacancies: शासकीय योजना झाल्या उदंड, अपुऱ्या यंत्रणेने पडतोय खंड; रायगड महसूल विभागाची २३८ पदे रिक्त

तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या नवीन बसेस आगारात दाखल करण्यात आल्या आहेत. नवीन बसमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असून, जुन्या बसवरील ताणही कमी होणार आहे.

लोकार्पणप्रसंगी हृषिकेश पवार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नगरसेवक जयेश पगार, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पगार, जितेंद्र पगार, मुन्ना पगार, ललित आहेर, सत्यवती आहेर, भाजप शहराध्यक्ष सतीश पगार, महेश काकुळते, पांडुरंग पाटील उपस्थित होते.

आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांनी आगाराच्या कामकाजाची माहिती देताना कळवण आगारात सध्या पाच नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल झाल्या असून, लवकरच आणखी १० नवीन बसेस मिळणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे आगाराची प्रवासी सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास सहायक वाहतूक अधीक्षक वसंत लव्हरे, वाहतूक निरीक्षक भाऊराव पवार, विक्रांत पगारे, लिपिक, चालक - वाहक उपस्थित होते.

ST BUS NEWS
Government Office Transparency: शासकीय कार्यालयांतील दिरंगाईवर नागरिकांचा संताप; पारदर्शक कारभाराची मागणी

बसमधून पदाधिकाऱ्यांचा फेरफटका

दाखल झालेल्या 'राजमाता जिजाऊ' बसच्या लोकार्पणानंतर नगराध्यक्ष कौतिक पगार, हृषिकेश पवार यांच्यासह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी नवीन बसमधून कळवण शहरात फेरफटका मारला. यावेळी नागरिकांनी नवीन सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

बसची वैशिष्ट्ये

या बसेसमध्ये ३ बाय २ आसन व्यवस्था असलेली ५६ आसने आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये ४ सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक बसविण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news