Kalpana Kharat News | कल्पना खरातच्या अटकेसाठी पोलिस पुन्हा कर्मयोगीनगरात

Kalpana Kharat News | भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणी वाढत असताना त्याची पत्नी कल्पना खरात ही अजूनही फरार असून, पोलिसांना चकवा देत असल्याचे समोर आले आहे.
Police
PoliceFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणी वाढत असताना त्याची पत्नी कल्पना खरात ही अजूनही फरार असून, पोलिसांना चकवा देत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत अशोक खरातविरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने तपास यंत्रणांवरही ताण वाढत आहे.

Police
Konkan Railway Special Trains | कोकण रेल्वेकडून इस्टर, उन्हाळी विशेष गाड्या

कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी शिर्डी तसेच नाशिक पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. मात्र, ती अद्याप हाती लागलेली नाही. २ एप्रिलला दुपारी पोलिसांनी गोविंदनगर परिसरातील कर्मयोगीनगर येथील तृप्तबाला बंगल्यावर छापा टाकला.

या ठिकाणी कल्पना खरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, धाडीत ती आढळून आली नाही.

Police
Ashok Kharat Nafed Onion Scam | नाफेड कांदा खरेदी घोटाळ्यातही भोंदू खरातचा हात

दरम्यान, शिर्डी येथील भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरुद्ध सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर २ आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कल्पना खरात ही या प्रकरणातील महत्त्वाची आरोपी मानली जात असून, तिची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांचे मत आहे. तिच्या फरारामुळे तपासात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. लवकरच कल्पना खरातला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news