

पंचवटी : श्री काळाराम मंदिर येथे वासंंतिक नवरात्र महोत्सवानिमित्त गायक पंडित अविराज तायडे यांचा अभंगवाणी हा सुश्राव्य अभंगाचा कार्यक्रम झाला. विविध अभंगाचे गायन करीत त्यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्णहरी’ या अभंगाने झाली. त्यानंतर ‘रुप पाहता हो लोचनी’, ‘तिर्थ विठ्ठ्ल’, ‘राम रंगी रंगीले’ अशा अनेक अभंगाच्या सादरीकरण त्यांनी केले. तर भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी तबल्यावर नितीन वारे, मृदुंगावर दिगंबर सोनवणे, हार्मोनियम संस्कार जानोरकर, स्वर साथ अशिष रानडे, ताल वाद्यावर अमित भालेराव, की बोर्डवर अमित तायडे, गिटार पार्थ शर्मा यांनी संगीत साथ केली. स्वानंद बेदरकर यांनी निरुपण केले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांंच्या गजरात उत्स्फुर्त दाद देत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
याप्रसंगी मंगला कलंत्री, ऋचिता ठाकूर, पंकज परशुरामपुरी यांचा सत्कार करण्यात आला. विश्वस्त मंदार जानोरकर व नरेश पूजारी यांनी स्वागत तर शिल्पा हासे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.