Jalgaon News | सोशल मीडिया वापरकर्त्यांना पोलिसांच्या सूचना, निवडणूक निकालानंतर या गोष्टी करु नका

Jalgaon News | सोशल मीडिया वापरकर्त्यांना पोलिसांच्या सूचना, निवडणूक निकालानंतर या गोष्टी करु नका
Published on
Updated on

जळगांव पुढारी वृत्तसेवा-  उद्या लोकसभा निवडणूकीची मतमोजणी असल्याने महत्वाचा दिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणीही निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशन) द्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या किंवा धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस ठेवू नये. तसे डिजिटल बॅनर बनवू नये नयेत. तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवू नये, तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ हद्दीतील सुजाण नागरिकांना पोलीस दलाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 16 मार्च 2024 पासून अद्याप पावेतो आदर्श आचार संहिता अंमलात असून संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल  दि. 04 जून 2024 रोजी जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने , कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट्स स्टोरी तसेच डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये.

व्हाट्सप ग्रुपचे अॅडमिन यांना सूचना

व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन यांनी 03 जून पासून त्यांच्या मोबाईल फोन मधील ग्रुपच्या सेटिंग मध्ये ONLY ADMIN करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाही. जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप एडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगाव यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news