Jalgaon News : महिलेवर बलात्कार करुन गर्भपात, चौघांवर गुन्हा

file photo
file photo

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जामनेर तालुक्यातील मांडवे या गावात एका तीस वर्षीय महिलेवर एका नराधमाने अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर तिचा बेकायदेशीर गर्भपात केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला व याप्रकरणातील इतर दोघांना अद्याप अटक झालेली नाही.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील मांडवे या गावात एक तीस वर्षीय महिला गावाजवळील नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता तेथे संशयित आरोपी शेनफडू रामदास सोनवणे याने पीडितेवर नदीच्या बाजूलाच बलात्कार केला. व तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार तीन ते चार वेळा जबरदस्ती केली. यामधून पीडित महिलेला गर्भधारणा झाली. याबाबत पीडित महिलेने आई बेबाबाई सुपडू जाधव हिला सांगितले असता संकेत अरबी बेबाबाई जाधव व सागर जाधव यांनी भीती व बदनामी पोटी डॉ. अनिता देवानंद सरताळे, (साई हॉस्पिटल वाघरी तालुका जामनेर) या ठिकाणी नेऊन तिचा गर्भपात केला. पीडित महिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर डॉ. विनय पंढरीनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेणफडू सोनवणे, बेबाबाई जाधव, सागर जाधव व डॉक्टर अनिता सरताळे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील शेणपुडू सोनवणे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे करीत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news