Jalgaon Fraud Case | दुसऱ्याची जमीन आपली दाखवून 17 लाखांवर डल्ला

Jalgaon Fraud Case | नाशिकच्या महिलेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक; पाच दिवसांची कोठडी
Jalgaon Fraud Case
Jalgaon Fraud Case File Photo
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

नशिराबाद येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात संपादित झालेल्या जागेचा मोबदला मिळविण्यासाठी चक्क बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची सुमारे १७ लाखांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या महिलेला जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Jalgaon Fraud Case
Nashik News | दिव्य महाआरतीने तेजोमय झाला गोदाघाट

सुनंदा मोतीलाल पाटील असे संशयित महिलेचे नाव असून, तिने चक्क दुसऱ्या महिलेच्या नावाचा वापर करून सरकारी तिजोरीवर न्यायालयाने या महिलेला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. डल्ला मारला. तालुक्यातील मौजे नशिराबाद येथील गट नं. २२०६ मधील प्लॉट नं. ३ व ४ ही जागा पुष्पा देवराम जावळे यांच्या मालकीची आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरणासाठी २०११ आणि २०१३ मध्ये यातील एकूण ४८८ चौ. मी. क्षेत्र संपादित करण्यात आले होते.

या संपादित जागेच्या मोबदल्याची १६ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी संशयित आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील (५९, रा. नाशिक) हिने बनावट कागदपत्रे सादर करीत डल्ला मारला. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. बँकेतील कागदपत्रे आणि फिर्यादीकडील फोटोंच्या आधारे गोपनीय बातमीदारांमार्फत संशयित महिलेची ओळख पटविण्यात आली. अखेर नाशिकच्या ज्ञानेश्वरनगर परिसरातून सुनंदा पाटील हिला पोलिसांनी शिताफीने अटक केली.

Jalgaon Fraud Case
Ajit Pawar Tribute | दादांची शेवटची सही देवळालीतील स्मशानभूमीसाठी

असा रचला बनाव

ऑगस्ट २०१८ मध्ये सुनंदा पाटील हिने आपणच 'पुष्पा जावळे' असल्याचे भासविले. खोटी कागदपत्रे आणि फोटो सादर करून तिने बँकेत खाते उघडले. प्रशासनाची दिशाभूल करून ही १७ लाखांची रक्कम आरटीजीएसद्वारे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतली आणि शासनाची मोठी फसवणूक केली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलिस हवालदार महेश महाजन, ईश्वर लोखंडे, प्रशांत लाड, चंद्रकांत पाटील, छाया पाटील आणि वैशाली सादरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दै. 'पुढारी' इम्पॅक्ट

शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करताना होणाऱ्या दुर्लक्षाचा फायदा घेत अशा भामट्यांचे धाडस वाढत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. याबाबत दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलिसांनी या महिलेला बेड्या ठोकल्या असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news