

नाशिक : राज्याच्या सुवर्णत्रिकोणात मुंबई, पुण्यानंतर उद्योगांसाठी सर्वाधिक पोषक जिल्हा म्हणून समोर येत असलेल्या नाशिकमध्ये बुधवारी (दि. ६) होणाच्या कुंभउद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक समिटमध्ये मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीच्या घोषणा अपेक्षित आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होत असून, यात १० मोठ्या गुंतवणुकीबाबतचे सामंजस्य करार केले जाणार आहेत. १५ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे.
नाशिकमध्ये अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच परिषद होत असून, दोन सत्रांत होणाऱ्या या परिषदेचे नियोजन उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह एमआयडीसी, विविध शासकीय विभाग व औद्योगिक संघटनांकडून केले जात आहे. पाथर्डी फाटा येथील हटिल ताज येथे आयोजित ही परिषद दोन सत्रांमध्ये होत आहे.
पहिल्या सत्रात मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील आपापल्या विभागांचे सादरीकरण करतील. यात नाशिकमध्ये कुठल्या कंपन्या येण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी काय सुविधा राहतील, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये होत असलेली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास या माध्यमातून नाशिकचा कायापालट कशा पद्धतीने होणार आहे, याची माहिती दिली जाईल.
उद्योजकांना त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, याचीही माहिती देऊन त्यांना नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण कसे आहे. ययासाठी प्रवृत्त केले जाईल. यापूर्वी गुंतवणुकीची घोषणा केलेल्या व्यावसायिकांसमवेत सामंजस्य करार केले जाणार आहेत.
दुसऱ्या सत्रात साधारणतः दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री फडणवीस उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून नाशिकच्या उद्योगविश्वाला मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई, पुण्यात उद्योग विस्ताराची संधी नसल्यामुळे नाशिकला ठळक प्राधान्य.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश शक्य.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची सुधारली कनेक्टिव्हिटी.
विविध विकासकामांच्या निविदांचा स्थानिक उद्योजकांनाही मोठा लाभ.
दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या धर्तीवर नाशिकला कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारावे.
नाशिक विमानतळाचा विस्तार करून, नाइट लेण्डिंगची व्यवस्था करावी, कार्गो सेवेचा विस्तार करावा, निफाड तालुक्यातील प्रस्तावित ड्रायपोर्टला गती द्यावी.
कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समिटद्वारे हजारो कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये प्रत्यक्षात साकारणार आहे. ही समिट नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने वरदान ठरणार असून, हे 'निमा'च्या पाठपुराव्याचे यश आहे.
- आशिष नहार, अध्यक्ष, 'निमा
14 स्टार असणार
परिषदेत नवीन उद्योजकांना उभारी देण्यासाठी १४ स्टार्टअपचे स्टॉल असणार आहेत. काही स्टॉल हॅकेथॉन प्रदर्शनातून निवडण्यात आले आहेत. काही नवीन संकल्पना मांडणाच्या नवउद्योजकांसाठी राखीव ठेवले आहेत. यांना या समिटच्या माध्यमातून चालना देण्याचे नियोजन आहे.